Cure India ... will give life to Childs in the country, Sonu sood will bear the cost of 'heart surgery' | 'दिल'वाला... चिमुकल्यांना जीवदान देणार, सोनू सूद 'हार्ट सर्जरी'चा खर्च उचलणार

'दिल'वाला... चिमुकल्यांना जीवदान देणार, सोनू सूद 'हार्ट सर्जरी'चा खर्च उचलणार

ठळक मुद्देमदतीचं दुसरं नाव म्हणजे सोनू सूद अशीच ओळख सोनू सूदची बनली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून सोनू सूदकडे मदत मागण्यात येत आहे. सोनूही आपल्या परीने शक्य तितक्यांना मदत करण्याचा व गरजवंतांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सोनू सूद गेल्या काही महिन्यांपासून गरजूंची सर्वोतोपरी मदत करतोय. कोरोना काळात हजारो स्थलांतरित मजुरांना त्याने सुरक्षित घरी पोहोचवले. यानंतरही त्याच्या मदतीचा ओघ सुरु आहे. विदेशातील गरिब विद्यार्थ्यांच्या शिक्षणापासून तर शेतात राबणा-या शेतक-यांपर्यंत अशा अडल्या नडल्या सर्वांना शक्य ती मदत देण्याचा त्याचा प्रयत्न आहे. यातूनच आता थांबायचं नाही, असे सोनू सूदने ठरवल्याचं स्पष्ट दिसतंय. कारण, इलाज इंडिया मोहिमेच्या माध्यमातून देशातील लहानग्यांना जीवदान देण्यासाठी सोनू पुढे आला आहे. 

मदतीचं दुसरं नाव म्हणजे सोनू सूद अशीच ओळख सोनू सूदची बनली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून सोनू सूदकडे मदत मागण्यात येत आहे. सोनूही आपल्या परीने शक्य तितक्यांना मदत करण्याचा व गरजवंतांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. या दरम्यान, सोनूने अनेकांना मदत केली आहे. कित्येकांना मोफत उपचार करत जीवदान दिले आहे. सोनूचे हे काम आता एक चळवळ बनत आहे. त्यातूनच सोनूने इलाज इंडिया नावाने नवीन मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून देशातील 0 ते 18 वर्षांपर्यंतच्या लहानग्यांच्या हार्ट सर्जरीची जबाबदारी सोनू सूद घेणार आहे. 

पीडियाट्र्रीक हार्ट सर्जरीसाठी इलाज इंडिया नावाने नवीन काम हाती घेतलं आहे. देशातील गरजूंना या सुविधेचा लाभ सरजरित्या मिळावा, यासाठी सोनूने टोल फ्री नंबरही जारी केला आहे. या सेवा योजनेला सोनूने इलाज इंडिया... समर्थ भारत, स्वस्थ भारत हे नाव दिले आहे. या महिन्यातील हे सोनूने लाँच केलेले तिसरे महत्त्वाचे काम ठरले आहे. यापूर्वी सोनूने आई सरोज सूद यांच्या नावाने स्कॉलरशीप सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर, तीन दिवसांपूर्वीच सोनूने स्कॉलिफाई नावाने अॅप लाँच केले असून त्याद्वारे युजर्संना 100 पेक्षा जास्त स्कॉलरशीप जिंकता येणार आहेत. आता, ह्रदयरोगाशी संबंधित हार्ट सर्जरीची जबाबदारी सोनू सूदने घेतली आहे. 

सोनूने ह्रदयरोगाशी संबंधित पीडियाट्रीक हार्ट सर्जरीसाठी गरजवंतांना पुढील टोल क्रमांक - 02067083686 शेअर केला असून याद्वारे आपणास मदत मिळणार आहे. या कामी रोटरीची मदत सोनूला होणार आहे. सोनूने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करुन या नव्या योजनेबद्दल माहिती दिली आहे. 

सोनू रियल हिरो

सोनू सूदने लॉकडाऊनच्या काळात देशभरातील हजारो स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी सुरक्षित पोहोचवले होते. लोकांना घरी पोहोचवण्यापासून ते त्यांना जेवण, आर्थिक मदत, घरे, रोजगार देण्यापर्यंत त्याने सर्वकाही केले होते. त्याच्या या कार्यामुळे तो अनेकांसाठी रिअल लाईफ हिरो ठरला आहे. अजूनही लोकांना मदत करण्याचा सोनूचा सिलसिला सुरु आहे. सोशल मीडियावर त्याला लोक अजूनही मदत मागत आहेत.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Cure India ... will give life to Childs in the country, Sonu sood will bear the cost of 'heart surgery'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.