शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला लागवड ठरली शेतकऱ्यांना फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 01:28 IST

नाशिक तालुका पूर्व भागातील शेतकरी बारमाही भाजीपाला पिके करतात. त्यामुळे रोजच्या रोज घरखर्चासाठी रोख पैसा मिळतो. या भागात दक्षिणेला दारणा व उत्तरेला गोदावरी नदी असल्याने शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होते. त्यामुळे परिसरातील शेतकरी टमाटे, कोबी, फ्लॉवर, मेथी, शेपू, भेंडी, गवार, कारले, गिलके, दोडके, भोपळा, कोथिंबीर हा नगदी भाजीपाला बारमाही घेतात.

ठळक मुद्देनगदी पिकांकडे कल : पूर्वभागात टमाटे लागवडीच्या क्षेत्रात वाढ

एकलहरे : नाशिक तालुका पूर्व भागातील शेतकरी बारमाही भाजीपाला पिके करतात. त्यामुळे रोजच्या रोज घरखर्चासाठी रोख पैसा मिळतो. या भागात दक्षिणेला दारणा व उत्तरेला गोदावरी नदी असल्याने शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होते. त्यामुळे परिसरातील शेतकरी टमाटे, कोबी, फ्लॉवर, मेथी, शेपू, भेंडी, गवार, कारले, गिलके, दोडके, भोपळा, कोथिंबीर हा नगदी भाजीपाला बारमाही घेतात.एकलहरे परिसरातील सामनगाव, कोटमगाव, मोहगाव, बाभळेश्वर, चांदगिरी, जाखोरी, हिंगणवेढे या परिसरात टमाट्यचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. वावरात सºया करून, मल्चिंग पेपर व ठिबक सिंचन पसरून, त्यावर होल पाडून नर्सरीतून आणलेली टमाटा रोपे लावली जातात. या भागात खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तीनही हंगामात टमाट्याची लागवड केली जाते. टमाट्याची पुसा रु बी, भाग्यश्री, वैशाली, रूपाली आदी प्रकारचे वाणलागवड केली जाते. एकरी सहा ते सात हजार रोपे लागवड होते. लागवडीनंतर पंधरा दिवसांनी बुरशी नाशक फवारणी केली जाते. ६० ते ६५ दिवसांनी पहिली तोडणी सुरू होते. एका झाडाला सुमारे २० ते २५ किलो शेतमाल निघतो. सायखेडा, नाशिक, पिंपळगाव मार्केटला अथवा थेट कंपनीला माल विकला जातो, असे येथील शेतकरी पप्पू जगताप यांनी सांगितले.या भागातील बहुतांश शेतकरी रोखीचे पीक म्हणून भेंडीची लागवड करतात. वावरात नांगरटी करून सºया तयार करून भेंडीच्या एकेक बियांची टोचन पद्धतीने लागवड केली जाते. सामनगाव, कोटमगाव शिवारात भेंडी लागवड मोठ्या प्रमाणात होते. राधिका, कावेरी, लावण्या, ताज या प्रकारचे भेंडीचे वाण लावले जातात. वेळेवर कीडनाशक फवारणी करून चांगली निगा राखली, तर सुमारे दीड महिन्यानंतर फुलकळी लागते, तर दोन महिन्यांत खुडणी सुरू होते. एका क्रे टमध्ये साधारण दहा किलो भेंडी बसते. २५० ते ३०० रु पये प्रमाणे क्रे टची विक्र ी होते. येथील शेतकरी नाशिकरोड स्थानिक भाजी बाजारात भेंडीची विक्र ी करतात. त्यामुळे रोख पैसा हातात मिळत असल्याने घरगुती किराणा, दैनंदिन गरजा भागवण्यास हातभार लागतो, असे सामनगावचे शेतकरी तानाजी जगताप यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी