सिडकोत शिंपी समाजातर्फे वधू-वर मेळावा उत्साहात

By Admin | Updated: April 15, 2016 23:47 IST2016-04-15T01:55:09+5:302016-04-15T23:47:33+5:30

सिडको : असंघटित समाज घटक संधी उपलब्ध असूनही प्रगती साधू शकत नाही. एकत्रिकरणाच्या प्रक्रियेतून समाजाची जडणघडण होत जाते. संघटितपणातच सामाजिक सौख्य दडलेले आहे. त्यामुळे वधू-वर मेळाव्यासारखे उपक्रम समाजाला एकत्र आणण्यासाठी उपयुक्त ठरत आहे, असे प्रतिपादन महापौर अशोक मुर्तडक यांनी आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

Cuddkot Shimpi community celebrates the Bride-Fairs rally | सिडकोत शिंपी समाजातर्फे वधू-वर मेळावा उत्साहात

सिडकोत शिंपी समाजातर्फे वधू-वर मेळावा उत्साहात

सिडको : असंघटित समाज घटक संधी उपलब्ध असूनही प्रगती साधू शकत नाही. एकत्रिकरणाच्या प्रक्रियेतून समाजाची जडणघडण होत जाते. संघटितपणातच सामाजिक सौख्य दडलेले आहे. त्यामुळे वधू-वर मेळाव्यासारखे उपक्रम समाजाला एकत्र आणण्यासाठी उपयुक्त ठरत आहे, असे प्रतिपादन महापौर अशोक मुर्तडक यांनी आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
श्री क्षत्रिय अहिर शिंपी सिडको मंडळातर्फे वधू-वर मेळाव्यात मुर्तडक बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिडको मंडळाचे अध्यक्ष शेखर निकुंभ हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक सतीश सोनवणे, महिला जिल्हा अध्यक्ष शोभा बोरसे, अमर सोनवणे, संदीप खैरनार, राजेंद्र जाधव, रोहिणी बागुल, रंजना भांडारकर आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
मंडळाचे अध्यक्ष शेखर निकुंभ यांनी सांगितले की, सत्य पाहता नोकरीपेक्षा वधू-वर पित्यांनी शिवणकाम करणार्‍यांना आपल्या मुली दिल्या पाहिजे. पालकांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमास सुधाकर सोनवणे, सुभाष बेंडाळे, अजय खैरनार, राजेंद्र जाधव, दीपक कापडणीस, प्रशांत चव्हाण, दिगंबर गवांदे, अरुण महाले, भागवत बोरसे, विजय भांबरे, डॉ. विजय बिरारी, ॲड. जयप्रकाश चव्हाण, सुनील गांगुर्डे, एम. आर. शिंपी, सुरेश सोनवणे, रमेश बागुल, मनोहर कापडणे आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन नरेंद्र जगताप, शशिकांत मांडगे यांनी केले.

Web Title: Cuddkot Shimpi community celebrates the Bride-Fairs rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.