शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघात! पतीच्या अस्थी विसर्जनासाठी जाणाऱ्या पत्नीचा मृत्यू; 11 जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 15:21 IST

अपघातात कुटुंबातील एकूण 11 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हरियाणातील बहादूरगडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. भीषण अपघातात  पतीच्या अस्थी विसर्जनासाठी जाणाऱ्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. या अपघातात कुटुंबातील एकूण 11 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बहादूरगडमधून जाणाऱ्या केएमपी एक्स्प्रेस वेवर ही घटना घडली. 

भरधाव वेगाने जाणारी क्रूझर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली, त्यात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. तर कुटुंबातील 11 जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी बहादुरगड रुग्णालयात आणण्यात आले, परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पीजीआय रोहतक येथे पाठविण्यात आले. मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बहादुरगड रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. 

बहादूरगडच्या जाखोडा गावाजवळील उड्डाणपुलाजवळ हा अपघात झाला. गीता असं मृत महिलेचं नाव असून ती गुजरातची रहिवासी आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, गीता यांच्या पतीचे एक वर्षापूर्वी निधन झाले होते आणि गीताचं संपूर्ण कुटुंब हरिद्वारला गंगेत अस्थी विसर्जित करण्यासाठी जात होते. बहादूरगडच्या जाखोडा गावाजवळ पोहोचल्यावर त्यांची कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. 

या अपघातात गीता यांचा मृत्यू झाला. त्याचवेळी या भीषण अपघातात त्यांच्या कुटुंबातील 11 सदस्य गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी पीजीआय रोहतकमध्ये पाठवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच बहादूरगड पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. जखमींचे जबाब घेतल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Accidentअपघात