पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 20:21 IST2025-05-03T19:43:23+5:302025-05-03T20:21:12+5:30
पाकिस्तानी महिलेशी विवाह करणाऱ्या कॉन्स्टेबल मुनीर अहमदविरुद्ध सीआरपीएफने बडतर्फीची कारवाई केली आहे.

पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
CRPF sacks Munir Ahmed: केंद्रीय राखीव पोलिस दलातील कॉन्स्टेबल मुनीर अहमदविरुद्ध कारवाई कठोर कारवाई करण्यात आली आहे. औपचारिक मान्यता नसतानाही मुनीर अहमदने पाकिस्तानी महिलेशी विवाह केला होता. त्यानंतर आता सीआरपीएफने मुनीर अहमदला राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे सांगत सेवेतून बडतर्फ केले आहे. मुनीरवर पाकिस्तानी महिलेसोबतचे विवाह केल्याचे लपवून ठेवल्याची आरोप करण्यात आला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने व्हिजिटिंग व्हिसा असलेल्या पाकिस्तानात परत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये मुनीर अहमदची पत्नी देखील होती. मात्र कोर्टाच्या आदेशानंतर तिला भारतात राहण्याची परवानगी मिळाली होती. मात्र आता सीआरपीएफने मुनीरविरोधात कडक कारवाई केली आहे.
सीआरपीएफ जवान मुनीर खानचा अडीच महिन्यांपूर्वी पाकिस्तानी नागरिक मीनल खानशी विवाह झाला होका. त्यानंतर ती व्हिजिटिंग व्हिसावर भारतात आली आणि नंतर तिने दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज केला होता. पण तिच्या व्हिसाची मुदत २२ मार्च २०२५ रोजी संपली होती आणि तरीही ती भारतात राहत होती. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यास सांगितले होते. त्यानंतर मीनल खानची दीर्घकालीन व्हिसासाठी मुलाखत घेण्यात आली होती. ज्या दिवशी ती अटारी-वाघा सीमेवर होती त्याच दिवशी जम्मू आणि काश्मीर हायकोर्टात तिच्या याचिकेवर सुनावणी पार पाडली. कोर्टाने अंतरिम आदेश दिल्यानंतर तिला सीमेवरून परत पाठवण्यात आले होते.
सीआरपीएफकडून प्रक्रिया किंवा मंजुरी मिळण्यापूर्वीच मुनीर अहमदने व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलद्वारे विवाह केला होता. कोर्टात हे प्रकरण गेल्यानंतर सीआरपीएफकडून शिस्तभंगाची कारवाई सुरु करण्यात आली होती. जम्मूमधील हंडवाल येथील रहिवासी मुनीर २०१७ मध्ये सीआरपीएफमध्ये सामील झाला होता. मात्र आता मुनीरवर देशाच्या सुरक्षेशी तडजोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
#WATCH | Pahalgam, J&K | "...Who were they who killed Kashmiri Pandits. Being the CM, the places where I couldn't go, Mehbooba Mufti used to go to the houses of terrorists. We have never been with terrorism, and we have never been a Pakistani - neither we were nor we will be.… pic.twitter.com/iRPO0htTsv
— ANI (@ANI) May 3, 2025
"हा गंभीर चिंतेचा विषय आहे. सीआरपीएफच्या ४१ बटालियनचे सीटी/जीडी मुनीर अहमद यांना पाकिस्तानी नागरिकाशी विवाह केल्याचे लपवल्याबद्दल आणि व्हिसाच्या वैधतेपेक्षा जास्त काळ तिला जाणूनबुजून आश्रय दिल्याबद्दल तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. त्याचे कृत्य सेवा वर्तनाचे उल्लंघन करणारे आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे आढळून आले आहे," असे सीआरपीएफकडून सांगण्यात आले आहे.