सगरोळी परिसरात अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान
By Admin | Updated: March 8, 2015 00:30 IST2015-03-08T00:30:45+5:302015-03-08T00:30:45+5:30
सगरोळी : सगरोळीसह परिसरात शनिवारी व रविवारी झालेल्या जोरदार अवकाळी पावसाच्या मोठा तडाका रबिसह अनेक पिकांना बसला असून यात शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले.

सगरोळी परिसरात अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान
स रोळी : सगरोळीसह परिसरात शनिवारी व रविवारी झालेल्या जोरदार अवकाळी पावसाच्या मोठा तडाका रबिसह अनेक पिकांना बसला असून यात शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले.सगरोळी परिसरात पावसाअभावी आधिच खरीप हंगाम हातचा गेला. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना अल्पशा पावसावर सगरोळी परिसरात रब्बी हंगामातील गहू, हरभरा, सूर्यफूल, भात (साळ), ज्वारी या पिकावर शेतकरी मोठी भिस्त ठेवली होती मात्र शनिवारी आणि रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान करुन आधिच भर पाडली. या अवकाळी व वादळी वार्यासह पडलेल्या पावसाने ज्वारीसह सर्व पिके पूर्णत: जमीनदोस्त झाली असून हरभरा, गव्हाची कापणी झाल्याने मातीत मिसळले तर ज्वारीचे कणसे जमीनीवर मातीत लोळत आहेत. सूर्यफूल व भात (साळ) पिकांचेही नासाडी झाल्याने शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले.सगरोळी परिसरातील खतगाव, केसराळी, हिप्परगा (थडी), शिंपाळा, दौलतापूर, रांगोळी, बोळेगाव, लघूळ, येसगी, बाभळी, बडूर, कार्ला (खु), हिंगणी, पोखर्णी, बावलगाव, कार्ला (बु), गंजगाव, माचनूर आदी गावात हरभरा, गहू, सूर्यफूल व ज्वारांची पेरणी मोठ्या प्रमाणात शेतकर्यांनी केली होती. सध्या ही पिके कापली होती तर ज्वारी काढणीला तर काही शेतकरी काढणी करुन मोडणी व राशीची तयारी करीत होती. मात्र काढणी व राशी पूर्वीच अवकाळी पावसाने दगा दिल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचा पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे विश्वनाथ पाटील समन, परमेश्वर पाटील यांनी केली. एकंदरीत अगोदरच दुष्काळी परिस्थितीने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांना वादळीवार्यासह अवकाळी पावसाला सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. (वार्ताहर)