शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
4
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
5
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
6
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
7
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
8
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
9
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
10
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
11
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
12
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
13
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
14
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
15
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
16
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
17
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
18
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
19
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!

सचिन पायलट यांच्यावर टीका, गेहलोतांना काँग्रेसचा स्पष्ट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 06:55 IST

‘राजस्थानमध्ये काही मतभेद आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही अनपेक्षित शब्द वापरले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गेल्या आठवड्यात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सचिन पायलट यांच्याबाबतीत केलेले वक्तव्य करायला नको होते, वेळ पडल्यास काँग्रेस राजस्थानमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कठोर निर्णय घेण्यास मागेपुढे पाहणार नाही,’ असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मध्य प्रदेशातील इंदूर येथे भारत जोडो यात्रेदरम्यान दिला आहे.

‘राजस्थानमध्ये काही मतभेद आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही अनपेक्षित शब्द वापरले आहेत. मला आश्चर्य वाटले. अशोक गेहलोत यांनी मुलाखतीत असे शब्द वापरायला नको होते,’ असे रमेश यांनी सांगितले. ‘आम्ही राजस्थानच्या समस्येवर तोडगा काढू, ज्यामुळे आमची संघटना मजबूत होईल. यासाठी जर आम्हाला कठोर निर्णय घ्यायचे असतील तर आम्ही ते घेऊ. जर तडजोड करायची असेल तर ती केली जाईल,’ अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

नेमका वाद काय ?गुरुवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या एका विशेष मुलाखतीदरम्यान मुख्यमंत्री गेहलोत यांनी प्रतिस्पर्धी सचिन पायलट यांच्यावर टीका करताना ते कधीही राजस्थानचे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, असा दावा केला होता. दरम्यान, काँग्रेसला एकतेचे दर्शन घडविणे आवश्यक असताना पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे असे बोलणे अशोभनीय आहे, अशी प्रतिक्रिया पायलट यांनी व्यक्त केली आहे.

दोन्ही नेत्यांची गरज : जयराम रमेशजयराम रमेश म्हणाले की, पक्षाला दोन्ही नेत्यांची गरज आहे आणि काँग्रेस नेतृत्व राजस्थानमधील वादावर योग्य तोडगा काढण्याचा विचार करत आहे. पुढील वर्षी नवीन सरकारसाठी मतदान होईल; परंतु मी या उपायासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित करू शकत नाही. 

टॅग्स :congressकाँग्रेसAshok Gahlotअशोक गहलोतSachin Pilotसचिन पायलट