शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

धमक्या देणा-यांप्रमाणेच भन्साळीही दोषी, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 4:08 AM

गोरखपूर : ‘पद्मावती’ चित्रपटातील कलाकारांना धमक्या देणारे जसे दोषी आहेत तसे निर्माते संजय लीला भन्साळीही काही कमी दोषी नाहीत, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी त्यांना लक्ष्य केले;

गोरखपूर : ‘पद्मावती’ चित्रपटातील कलाकारांना धमक्या देणारे जसे दोषी आहेत तसे निर्माते संजय लीला भन्साळीही काही कमी दोषीनाहीत, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी त्यांना लक्ष्य केले; आणि भन्साळी यांना लोकांच्या भावनांशी खेळण्याची सवय झाली आहे, अशी टीकाही केली.योगी आदित्यनाथ म्हणाले की, कुणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. मग ते संजय लीला भन्साळी असोत की, अन्य कोणी. चित्रपट कलाकारांना धमक्या देणारे जसे दोषी आहेत तसे भन्साळीही दोषी आहेत. कारवाई करायची झाली तर दोघांवरही झाली पाहिजे. कलाकारांना दिलेल्या धमक्यांविषयी ते म्हणाले की, एकमेकांच्या भावनांचा सन्मान केला तर समस्या निर्माण होणार नाहीत.राज्य सरकारने ‘पद्मावती’तील आक्षेपार्ह दृश्ये हटविल्याशिवाय उत्तर प्रदेशात चित्रपटाचे प्रदर्शन होऊ देणार नाहीत, असे १९ नोव्हेंबर रोजी जाहीर केले आहे. >तोडग्याचा प्रयत्नजे वातावरण निर्माण झाले आहे, त्यास सेन्सॉर बोर्ड कारणीभूत नाही. आम्ही वादातून तोडगा काढू इच्छित आहोत, असे बोर्डाचे अध्यक्ष प्रसुन जोशी यांनी म्हटले आहे.>दीपिकाचे शीर सुरक्षित राहावे!अभिनेते कमल हासन म्हणाले की, दीपिकाच्या स्वातंत्र्याचा सन्मान करावा. दीपिकाचे शीर सुरक्षित राहायला हवे. अनेक समुदायांनी माझ्या चित्रपटांनाही विरोध केला होता. वादविवादात अतिरेक निंदनीय आहे.

टॅग्स :Padmavatiपद्मावतीSanjay Leela bhansaliसंजय लीला भन्सालीyogi adityanathयोगी आदित्यनाथ