Crime: ​​​​​​​स्पाय कॅमेऱ्याने महिलेचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड; पायलटला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 13:09 IST2025-09-05T13:07:28+5:302025-09-05T13:09:53+5:30

एका खाजगी विमान कंपनीच्या पायलटने एका महिलेचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्याची माहिती समोर आली.

Crime: Spy camera records offensive video of woman: Pilot arrested | Crime: ​​​​​​​स्पाय कॅमेऱ्याने महिलेचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड; पायलटला अटक

Crime: ​​​​​​​स्पाय कॅमेऱ्याने महिलेचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड; पायलटला अटक

देशाची राजधानी दिल्लीत अत्यंत लज्जास्पद घटना घडली. एका खाजगी विमान कंपनीच्या पायलटने एका महिलेचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी पायलटला अटक केली असून त्याच्याकडून लायटरच्या आकाराचा स्पाय कॅमेरा जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किशनगढ पोलीस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ३० ऑगस्ट रोजी रात्री १०:२० वाजता ती किशनगढ गावातील शनी बाजारात असताना एका पुरुषाने लाइटरसारख्या दिसणाऱ्या उपकरणाने तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला.या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसानी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याला बेड्या ठोकल्या. 

मोहित प्रियदर्शी (वय, ३१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा आग्रा येथील सिव्हिल लाईन्सचा रहिवासी असून एका खाजही विमान कंपनीत पायलट म्हणून काम करतो. पोलिसांनी आरोपीकडून लाइटरच्या आकाराचा एक छोटा स्पाय कॅमेरा जप्त केला आहे. चौकशीदरम्यान, त्याने वैयक्तिक समाधानासाठी असे व्हिडिओ बनवत असल्याची कबुली दिली. आरोपीविरुद्ध किशनगढ पोलीस ठाण्यात कलम ७७/७८ बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 

Web Title: Crime: Spy camera records offensive video of woman: Pilot arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.