Crime News: हॉस्पिटलमध्ये घडली धक्कादायक घटना, उपचारांसाठी दाखल पुरुष अर्भक चार दिवसांत बनलं स्त्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 13:53 IST2022-04-18T13:52:10+5:302022-04-18T13:53:01+5:30
Crime News: बिहारमधील एका सरकारी रुग्णालयात धक्क्कादायक घटना घडली आहे. या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेले नवजात पुरुष अर्भक स्त्री बनल्याने खळबळ उडाली आहे.

Crime News: हॉस्पिटलमध्ये घडली धक्कादायक घटना, उपचारांसाठी दाखल पुरुष अर्भक चार दिवसांत बनलं स्त्री
पाटणा - बिहारमधील एका सरकारी रुग्णालयात धक्क्कादायक घटना घडली आहे. या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेले नवजात पुरुष अर्भक स्त्री बनल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही हेराफेरी केल्याचा आरोप रुग्णालय कर्मचाऱ्यांनी केल्याचा आरोप होत आहे. एका आजारी नवजात मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र चार दिवसांच्या उपचारांनंतर जेव्हा बाळाचा मृत्यू झाला तेव्हा ते बाळा मुलग्याची मुलगी बनले होते.
ही घटना हाजीपूरमधील असून, मृत मुलाच्या नातेवाईकांकडून हे आरोप करण्यात येत आहेत. प्रकरणाचं गांभीर्य पाहूव डीएस डॉ. एस.के. वर्मा यांनी तपासासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. १४ एप्रिल रोजी राजापकड ठाणे क्षेत्रातील मोहम्मद युसूफ त्यांच्या पत्नीला घेऊन डिलिव्हरीसाठी बिदूपूर येथे जात होते. मात्रे वाटेतच तिने बाळाला जन्म दिला. त्यानंत मुलाला घेऊन ते रुग्णालयात पोहोचले. तिथे मुल अशक्त असल्याचे सांगत या नवजात अर्भकाला एसएनसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तीन दिवसांपर्यंत बाळाचे नातेवाईक त्याला बघत होते.
एंट्री करण्याच्या रजिस्टरपासून कागदपत्रांपर्यंत मुलाचे लिंग हे पुरुष लिहिण्यात आले होते. मात्र चौथ्या दिवशी रुग्णालयाने मुलाच्या प्रकृतीची तपासणी केली आणि प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. त्यानंतर दीड तासाने बाळाचा मृत्यू झाला. तसेच बाळाचा मृतदेहा नातेवाईकांना दिला गेला तेव्हा बाळाचे लिंग बदलून पुरुषाचे स्त्री झाले होते. हा प्रकार पाहून मृत बाळाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला.
मृत बाळाची आजी कुलसून खातून हिने सांगितले की, तिच्यासमोरच गाडीमध्ये मुलाचा जन्म झाला होता. त्याच्या मृत्यूची माहिती दिली आणि मृतदेह मागण्यात आला तेव्हा मुलाची मुलगी झाली होती. डीएस डॉ. एस.के. वर्मा यांनी सांगितले की, या घटनेची माहिती मिळाली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास केला जात आहे.