खळबळजनक! मुलाने रुग्णालयात नेतो सांगून आईला बाहेर आणलं अन् नदीत फेकलं; 'असा' रचला कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 15:24 IST2022-04-05T15:23:22+5:302022-04-05T15:24:02+5:30
Crime News : आईला रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी तिला शाहपूर तालुक्यामधील हुरासगुंडागी (Hurasagundagi) येथे घेऊन गेला आणि भीमा नदीत फेकून दिलं.

खळबळजनक! मुलाने रुग्णालयात नेतो सांगून आईला बाहेर आणलं अन् नदीत फेकलं; 'असा' रचला कट
नवी दिल्ली - कर्नाटकमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. यादगिर (Yadgir) जिल्ह्यात एका 38 वर्षीय व्यक्तीने आपल्या 60 वर्षीय आईला भीमा नदीत (Bhima river) फेकून तिचा जीव घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, भीमाशंकर यालिमेली (Bheemashankar Yalimeli) असं आरोपीचं नाव असल्याचं समोर आलं आहे. त्याने आपला मित्र मुत्तप्पा वद्दार (Muttappa Vaddar) याच्या मदतीने हा धक्कादायक प्रकार केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आपली आई रचम्मा शरबन्ना यालिमेली (Rachamma Sharabanna Yalimeli) हिला रुग्णालयात घेऊन जाण्याचं कारण सांगून बाईकवरुन घेऊन गेला. मात्र आईला रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी तिला शाहपूर तालुक्यामधील हुरासगुंडागी (Hurasagundagi) येथे घेऊन गेला आणि भीमा नदीत फेकून दिलं. बुधवारी जेव्हा महिलेचा मृतदेह नदीत तरंगताना दिसला तेव्हा या घटनेचा खुलासा झाला. पोलिसांनी तपास केल्यानंतर हा हत्येचा प्रकार असल्याचं समोर आलं.
भीमाशंकरने आई आजारी असल्यामुळे पत्नी वैतागली होती. त्यामुळे त्याने आईला नदीत फेकून मारून टाकल्याचं म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, आईच्या उपचारासाठी पैसे जमा करण्यासाठी खूप अडचणी येत होत्या. यावरुन त्याचे पत्नीसोबत वाद होत होते. त्यामुळे भीमाशंकर आणि त्याच्या मित्राने आईच्या हत्येचा कट रचला. याचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे.