क्राईम

By Admin | Updated: July 13, 2015 01:06 IST2015-07-13T01:06:51+5:302015-07-13T01:06:51+5:30

दक्षिण गोव्यात वाहन चोरी वाढली

Crime | क्राईम

क्राईम

्षिण गोव्यात वाहन चोरी वाढली
चालू वर्षात ४३ घटनांची नोंद
मडगाव : दक्षिण गोव्यात चालू वर्षात तब्बल ४३ वाहन चोरीच्या घटना घडलेल्या आहेत़ मडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत २४ प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यातील दहा प्रकरणांचा छडा पोलिसांनी लावला आहे.
वाहने पार्क करून ठेवण्यासाठी शहरात जागा अपुरी पडत आहे. पार्किंगसाठी जागाच उपलब्ध नसल्याने इमारतीच्या आवाराबाहेर वाहने पार्क करून ठेवावी लागतात. ही वाहने आता गायब होऊ लागली आहेत़ दक्षिणेत वाहन चोरीत हे प्रमाण ६0 टक्के इतके आहे. मडगाव पोलिसांनी वाहन चोरी प्रकरणात दोघांना अटक केली होती, तर मायणा-कुडतरी पोलिसांनीही एका चोरट्याला पकडून त्याच्याकडून दुचाकी जप्त केली होती.
याबाबत दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई म्हणाले की, पोलिसांनी वाहन चोरीची प्रकरणे गांभीर्याने घेतलेली आहेत. नुकतेच काही चोरट्यांना अटकही करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.