क्राईम
By Admin | Updated: July 13, 2015 01:06 IST2015-07-13T01:06:51+5:302015-07-13T01:06:51+5:30
मटरच्या नावाखाली चण्यांची विक्री

क्राईम
म रच्या नावाखाली चण्यांची विक्रीफोंड्यातील प्रकार : पाच किलो चणे ताब्यातफोंडा : फोंडा बाजारातील काही भाजी विक्रेते मटरच्या नावाखाली पाण्यात भिजवलेले चणे विकत असल्याचा धक्कादायक प्रकार एका जागरूक ग्राहकाच्या निदर्शनास आला़ याबाबत त्याने तत्काळ अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी राजीव कोरडे यांच्याकडे तक्रार केली़तक्रारीनुसार रविवार, दि़ १२ रोजी राजीव कोरडे यांनी फोंडा बाजारात येऊन संबंधित विक्रेत्यांजवळील पाच किलो चणे ताब्यात घेऊन नंतर त्यांची विल्हेवाट लावली. बाजारात मटरची मागणी मोठी आहे़ त्यामुळे याचा फायदा उठविण्यासाठी विक्रेत्याने चांगलीच शक्कल लढविल्याचे रविवारच्या प्रकारावरून लक्षात आले़ मटरचे दर गगनाला भिडले आहेत, तरीही वाढती मागणी पाहून डोकेबाजांनी मटरच्या जागी भिजवलेले हिरवे चणे खपविण्याची नामी शक्कल लढवली. ती काही प्रमाणात यशस्वीही झाली. शनिवारी फोंडा बाजारात गेलेल्या एका ग्राहकाला मटर खरेदी केल्यानंतर पिशवीला हिरवा रंग लागल्याचे आढळून आले. यावर संबंधित ग्राहकाने त्या भाजी विक्रेत्याला फैलावर घेतल्यावर त्याने आपली चूक कबूल केली. मात्र, या ग्राहकाने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देताच खात्याचे निरीक्षक कोरडे यांनी रविवारी फोंडा बाजारात फिरून मटरची तपासणी केली. या वेळी त्यांनी सुमारे पाच किलो बनावट मटर जप्त करून त्याची विल्हेवाट लावली. (प्रतिनिधी)