Cricketer Death Video:जम्मू-काश्मीरमधून अतिशय दुःखद बातमी आली आहे. एका उदयोन्मुख क्रिकेटपटूचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. फरीद हुसेन असे या क्रिकेटपटूचे नाव असून, अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता की, फरीदची काहीही चुकी नव्हती, कार चालकाच्या चुकीमुळे फरीदला आपला जीव गमवावा लागला.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये हुसेन स्कूटरवरुन जात असल्याचे दिसतोय. यावेळी रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या कारच्या चालकाने अचानक दरवाजा उघडला. फरीद थेट कारच्या दरवाज्यार धडकून खाली कोसळला, ज्यात त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर फरीदला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले होते, परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. ही घटना शनिवारी पूंछ जिल्ह्यात घडली आहे.
या सीसीटीव्ही फुटेजची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक लोक हा जम्मू-काश्मीर क्रिकेटसाठी मोठा धक्का मानत आहेत. फरीद हुसेन हा राज्यातील सर्वात उदयोन्मुख क्रिकेटूपैकी एक होता. फरीदने जम्मू-काश्मीरमध्ये प्रादेशिक पातळीवर खूप लोकप्रियता मिळवली होती. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.