शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 12:57 IST

चीन आता अरुणाचल प्रदेशमधील अनेक ठिकाणांची नावे बदलण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भारताने आता या कृतीचा तीव्र विरोध केला आहे.

एकीकडे भारत पकिस्तानमध्ये तणावाची स्थिती असताना, चीनसोबतही तणाव वाढताना दिसत आहे. चीन त्यांच्या सीमेला लागून असलेल्या भारतीय राज्यांमध्ये काहीना काही कारवाया करत राहतो. चीन आता अरुणाचल प्रदेशमधील अनेक ठिकाणांची नावे बदलण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भारताने आता या कृतीचा तीव्र विरोध केला आहे. तसेच, चीनची ही कृती अतिशय हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. 

अरुणाचल प्रदेशशातील काही ठिकाणांची नावे बदलण्याच्या चीनच्या या प्रयत्नांना भारताने विरोध केला आहे. "चीनच्या अशा हास्यास्पद प्रयत्नांनंतरही अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि कायम राहील, हे निर्विवाद सत्य कधीच बदलणार नाही", असे भारताने म्हटले आहे. दुसरीकडे, चीन बऱ्याच काळापासून अरुणाचल प्रदेश हा तिबेटचा दक्षिण भाग असल्याचा दावा करत आहे. 

नावं बदलण्याचा प्रयत्न हास्यास्पद!अरुणाचल प्रदेशतील काही ठिकाणांसाठी चीनने नवीन नावे जाहीर केल्यानंतर भारताने ड्रॅगनला ठणकावलं आहे. परराष्ट्र मंत्रालायचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले की, "आमच्या लक्षात आले आहे की, अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलण्याचा व्यर्थ प्रयत्न चीन करत आहे. अशी नावे बदलण्याचा निष्फळ प्रयत्न केल्याने अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग होता, आहे आणि कायमच राहणार आहे, हे सत्य तर बदलू शकत नाही."

अरुणाचल प्रदेश आमचा : चीन

मात्र, चीन अरुणाचल प्रदेशवर दावा करत आहे आणि तो आपला भाग असल्याचे म्हटले आहे. अरुणाचल प्रदेशातील लोकांना चीनमध्ये येण्यासाठी व्हिसाचीही गरज लागत नाही. यावर बोलताना चीनने म्हटले की,  अरुणाचल हा चीनचा एक भाग आहे आणि म्हणून त्यांना आपल्याच देशात येण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नाही. गेल्या वर्षीही चीनने अरुणाचल प्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणांच्या ३० नवीन नावांची यादी प्रसिद्ध केली होती, जी नंतर भारताने नाकारली होती. 

टॅग्स :chinaचीनArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशIndiaभारतborder disputeसीमा वाद