शहरं
Join us  
Trending Stories
1
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
2
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
3
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
4
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
5
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
6
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
7
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
8
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
9
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
10
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
11
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
12
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
13
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
14
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
15
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
16
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
17
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
18
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
19
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
20
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

सृजन घोटाळा प्रकरण : अशी कोणतीही टाकसाळ नाहीय, जी मला विकत घेईल - नितीश कुमार 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2017 12:23 PM

आतापर्यंत अशी कोणतीही टाकसाळ नाहीय, जी मला विकत घेऊ शकेल, अशी प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सृजन घोटाळ्याबाबत बोलताना दिली आहे.

पाटणा, दि. 25 -  आतापर्यंत अशी कोणतीही टाकसाळ नाहीय, जी मला विकत घेऊ शकेल, अशी प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सृजन घोटाळ्याबाबत बोलताना दिली आहे. नितीश कुमार यांची गुरुवारी संध्याकाळी पक्षाच्या आमदारांसोबत बैठक झाली होती.  यावेळी आपल्या आमदारांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, ''सृजन घोटाळा प्रकरण मी स्वतः उजेडात आणला. चौकशीदरम्यान या प्रकरणात अनेक बँकांची भूमिका पाहता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. सीबीआयला या प्रकरणाचा तपास करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून येत्या दोन दिवसांत तपास सुरू करण्यातही येणार आहे''.

शिवाय, विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांवरही नितीश कुमार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जी लोकं नैराश्यातून माझ्यावर जे काही आरोप करत आहेत त्यात काहीही तथ्य नाहीय, असे नितीश कुमार म्हणालेत. व्यवस्थेत असलेल्या कमतरतेचा काही जण फायदा घेत आहेत, मात्र लवकरच अशी व्यवस्था करण्यात येणार आहे, जेणेकरुन अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, असेही ते म्हणालेत. दरम्यान, यावेळी त्यांनी राबडीदेवींचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. 2003 पासून हा घोटाळा सुरू असल्याची टीका करत नितीश कुमार यांनी राबडीदेवी यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. 

या दरम्यान ‘सृजन’ घोटाळ्यातील एका आरोपीचा तुरुंगात मृत्यू झाला होता.  बिहार सरकारच्या कल्याण विभागाचा अधिकारी महेश मंडल याचा तुरुंगातच मृत्यू झाला.  मंडल किडनीच्या आजाराने त्रस्त असल्याचे सांगण्यात आले होते. यावर, मुख्य आरोपींना विषाचं इंजेक्शन देऊन मारल्याचा आरोप राबडीदेवी यांनी केला आहे.काय आहे घोटाळा?‘सृजन’ या स्वयंसेवी संस्थेच्या खात्यात सरकारी निधीचे झालेले हस्तांतरण पाहून २००८मधील येथील जिल्हाधिकारी विपीन कुमार यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. त्यानंतर या एनजीओकडे देण्यात आलेले काम तत्काळ थांबवण्याचे आदेश त्यांनी दिले. याप्रकरणी आत्तापर्यंत १८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये ११ सरकारी अधिकाऱ्यांचा तर ४ सृजन महिला विकास सहयोग समिती लिमिटेडच्या आणि ३ बँकेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.या प्रकरणात ‘सृजन’ महिला सहयोग समितीने सरकारी विभाग आणि दोन बँकेच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरत घोटाळ्याचा कट रचला होता. त्याद्वारे ८८४ कोटी रूपयांचा चुना सरकारला लावण्यात आला होता. अशाच पद्धतीचे आणखी प्रकार उघड होण्याची शक्यता आहे. कारण बिहार सरकारच्या इतरही काही विभागांचे लेखापरिक्षण करण्यात येत आहे.   

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमार