चार वर्षानंतर नितीश कुमार यांची भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये 'घरवापसी'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 01:22 PM2017-08-19T13:22:01+5:302017-08-19T14:19:00+5:30

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा संयुक्त जनता दल भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी झाला आहे.

Four years later, in the Nitish Kumar Narendra Modi's National Democratic Front | चार वर्षानंतर नितीश कुमार यांची भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये 'घरवापसी'

चार वर्षानंतर नितीश कुमार यांची भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये 'घरवापसी'

Next

पाटणा, दि. 19 - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा संयुक्त जनता दलाने भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. चारवर्षानंतर जदयू एनडीएच्या कळपात दाखल झाला आहे. 

चारवर्षांपूर्वी 2013 मध्ये भाजपाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव म्हणून जाहीर केल्यानंतर नितीश कुमार यांनी दोन दशकापासूनची भाजपाबरोबरची युती तोडली होती. धर्मनिरपेक्षतेच्या आधारावर नितीश यांनी त्यावेळी भाजपाबरोबरची आघाडी तोडली होती.
पण मागच्या महिन्यात बिहारच्या राजकारणात नाटयमय घडामोडी घडल्या. लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर नितीश यांनी काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल महागठबंधनची साथ सोडून पुन्हा भाजपाबरोबर सरकार स्थापन केले.  

आज नितीश कुमार यांच्या निवासस्थानी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या  बैठकीत भाजपाप्रणीत एनडीएमध्ये सहभागी होण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी नाराज असलेल्या शरद यादव गटातील काही कार्यकर्ते नितीश कुमार यांच्या निवास्थानाबाहेर पोहोचले तिथे त्यांनी एनडीमध्ये सहभागी होण्याचा निषेध करत नितीश यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 
 

बिहारच्या अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस आणि पूरामुळे हाहाकार निर्माण झाला असला तरी, राज्यातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. 
नितीश कुमार यांनी सरकार बनवण्याचा निर्णय खूपच घाईघाईत घेतला होता. एवढ्या लवकर महाआघाडी तोडून भाजपाच्या समर्थनानं सरकार बनवण्याच्या निर्णयाचं मी समर्थन करू शकत नाही. 2013ला भाजपाशी युती तुटल्यानंतर शरद यादव यांनी भाजपावर उघड हल्लाबोल केला होता. तर जेडीयूचे खासदार अली अनवर यांनीही अंतरात्म्याचा आवज ऐकून नितीश कुमाराच्या निर्णयाला समर्थन देऊ शकत नसल्याचं म्हटलं आहे. 

मी इंदिरा गांधींचांही सामना केला आहे, आता कोणालाच घाबरत नाही
जेडीयूचे वरिष्ठ नेता शरद यादव यांनी आपल्याविरोधात कारवाई करण्याची दिलेली धमकी फेटाळून लावली आहे. बिहारमधील महाआघाडी तोडून भाजपाशी हातमिळवणी केल्याने शरद यादव मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर नाराज आहेत. आपली ही नाराजी त्यांनी उघड केली असून, नितीश कुमार यांच्यावर टीकाही केली आहे. दरम्यान शरद यादव यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जेडीयूमधील काही नेते करत असल्याच्या वृत्तावर बोलताना, आपण माजी पंतप्रधान इंदिर गांधींच्या विरोधातही उभे राहिलो होतो, आणि आता कोणालाच घाबरत नाही असं सांगितलं आहे. 

Web Title: Four years later, in the Nitish Kumar Narendra Modi's National Democratic Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.