सैन्यात ‘स्वतंत्र आदिवासी रेजिमेंट तयार करा’, मराठमोळ्या खासदाराची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 07:32 IST2022-03-29T07:32:05+5:302022-03-29T07:32:39+5:30

आदिवासी लोकांसाठी स्वतंत्र “आदिवासी” रेजिमेंट केल्यास आदिवासी समाजाचा आदर होईल

'Create an Independent Tribal Regiment' in the Indian Army, demands of Marathmolya MPs | सैन्यात ‘स्वतंत्र आदिवासी रेजिमेंट तयार करा’, मराठमोळ्या खासदाराची मागणी

सैन्यात ‘स्वतंत्र आदिवासी रेजिमेंट तयार करा’, मराठमोळ्या खासदाराची मागणी

नवी दिल्ली : शीख रेजिमेंट, गोरखा रेजिमेंट, राजपूत रेजिमेंट, जाट रेजिमेंट, मराठा रेजिमेंटच्या धर्तीवर आदिवासी लोकांसाठी भारतीय सैन्यदलात स्वतंत्र आदिवासी रेजिमेंट तयार करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत केली आहे.

आदिवासी लोकांसाठी स्वतंत्र “आदिवासी” रेजिमेंट केल्यास आदिवासी समाजाचा आदर होईल आणि अधिकाधिक आदिवासी तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी काम करण्यास प्रोत्साहन मिळेल. आदिवासी लोकांसाठी काही शब्द वापरले जातात जे अत्यंत अपमानास्पद आणि आक्षेपार्ह आहेत. 

Web Title: 'Create an Independent Tribal Regiment' in the Indian Army, demands of Marathmolya MPs