करवाढ विरोधात माकपची निदर्शने

By Admin | Updated: February 16, 2015 23:55 IST2015-02-16T23:55:08+5:302015-02-16T23:55:08+5:30

फोटो आहे...

CPI (M) protest against tax hike | करवाढ विरोधात माकपची निदर्शने

करवाढ विरोधात माकपची निदर्शने

टो आहे...
नागपूर : प्रस्तावित मालमत्ता करवाढ व पाणी शुल्कातील दरवाढीला विरोध दर्शविण्यासाठी महापालिकेच्या महाल येथील टाऊ न हॉल कार्यालयापुढे सोमवारी माकपतर्फे निदर्शने करण्यात आली.
स्थायी समितीने १३ टक्के करवाढ प्रस्तावित केली आहे. याचा सर्वसामान्यासह झोपडपट्ठीधारकांनाही फटका बसणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हा सचिव अमृत मेश्राम यांनी दिली. सत्तेत नसताना करवाढीला विरोध करणारा भाजप आज मागील सरकारप्रमाणे निर्णय घेत आहे. नगरसेवकांनी या करवाढीला विरोध करण्याचे आवाहन त्यांनी केले. मेश्राम यांच्यासह मनोहर मुळे, विश्वनाथ आसई, रामेश्वर चरपे, विलास जांभुळकर, आर.एन. पाटणे आदींनी मार्गदर्शन केले. आंदोलनात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)

Web Title: CPI (M) protest against tax hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.