शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

“अन्यथा गलवान, डोकलाममध्ये भारताला विजय मिळवता आला नसता, देशाची प्रतिष्ठा वाढली”

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 4:21 PM

गेल्या वर्षी भारत आणि चीनमध्ये गलवान घाटीच्या परिसरात मोठा संघर्ष पाहायला मिळाला.

नवी दिल्ली: गेल्या वर्षी भारत आणि चीनमध्ये गलवान घाटीच्या परिसरात मोठा संघर्ष पाहायला मिळाला. या रक्तरंजित संघर्षात भारताचे जवान शहीद झाले. तर, दुसरीकडे चीनलाही मोठा फटका बसला. मात्र, अद्याप चीनने तसे मान्य केलेले नाही. यासंदर्भात भारतीय लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती यांनी सुरक्षेतील गुंतवणुकीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. डोकलाम आणि गलवानमधील घटनांमुळे देशाची प्रतिष्ठा वाढली असून, संरक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीमुळेच हे शक्य झाल्याचे मोहंती यांनी नमूद केले. (army vice chief cp  mohanty says if the country did not invest in security we would have probably lost the war in kargil)

“शिवसेनेचा मनापासून शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला पाठिंबा”: संजय राऊत

लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना संरक्षण क्षेत्रात केंद्राने केलेल्या गुंतवणुकीबाबत मोठे विधान केले. देशाने सुरक्षेत गुंतवणूक केली नसती तर आम्ही कारगील, डोकलाममधील युद्धात पराभूत झालो असतो. जम्मू -काश्मीरमधील अंतर्गत सुरक्षा, तसेच आपला ईशान्य प्रदेश अशांत झाला असता आणि नक्षलवाद्यांना मोकळे मैदान मिळाले असते, असे मोहंती यांनी नमूद केले. 

“अमित शाह म्हणजे गजनी, उद्धव ठाकरे मात्र रामशास्त्री बाण्याचे नेतृत्व”; शिवसेनेची बोचरी टीका

डोकलाम, गलवानमधील घटनांमुळे देशाची प्रतिष्ठा वाढली

तिबेटमध्ये मजबूत सशस्त्र सेना असती तर त्यांच्यावर कधीही आक्रमण झाले नसते. डोकलाम आणि गलवानमधील घटनांमुळे देशाची प्रतिष्ठा वाढली. पण त्याचसोबतच देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा दर्जा देखील दिला गेला.  प्रत्येकजण भारताकडे एक सुरक्षा प्रदाता म्हणून पाहतो. ते एका मोठ्या राष्ट्राच्या विरोधात सुरक्षा कवच आहे, असे मोहंती यांनी सांगितले. 

“राजसाहेब, भाजपशी युती करा, फायदा होईल”; पुण्यातील मनसे नेत्यांचा दबाव वाढला!

शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना ईडीचे समन्स; सिटी बँक घोटाळा प्रकरणी हजर राहण्याचे आदेश

भारतीय सशस्त्र दल राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक

भारतीय सशस्त्र दल राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहेत. कारण ते जात आणि पंथ या सर्वांवर आहेत. भारतीय सशस्त्र दलांना कोणत्याही राजकीय आकांक्षा नसतात आणि ते देशातील राजकारणाचा आदर करतात. अशी अनेक उदाहरण आहेत जिथे लष्करी नेत्यांना राजकीय आकांक्षा असतात. मात्र, भारतीय लष्कर दलांची अशी कोणतीही इच्छा नाही, असे मोहंती यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीladakhलडाखIndian Armyभारतीय जवान