447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 09:52 PM2021-01-17T21:52:19+5:302021-01-17T21:58:32+5:30

Corona Vaccination: कोरोना लसीकरणानंतर आतापर्यंत एकूण 447 लोकांमध्ये साईड इफेक्ट दिसून आले आहेत. यामधील  तीन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

covid vaccine govt says a total of 447 adverse events following immunisation reported 3 cases required hospitalisation | 447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात

447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात

Next
ठळक मुद्देआज कोरोना लसीकरणाच्या दुसर्‍या दिवशी 17,072 लोकांना लसीचे डोस देण्यात आले.देशात आतापर्यंत एकूण 2,24,301 लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. ही जगातील सर्वात मोठे लसीकरण मोहीम आहे. मात्र, यादरम्यान, या लसीचे प्रतिकूल परिणाम (साईड इफेक्ट) बर्‍याच लोकांमध्ये दिसून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, कोरोना लसीकरणानंतर आतापर्यंत एकूण 447 लोकांमध्ये साईड इफेक्ट दिसून आले आहेत. यामधील  तीन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याआधी दिल्लीत 52 आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोनावरील लस दिल्यानंतर त्रास झाला होता. त्यापैकी काहींनी अॅलर्जीची तक्रार केली तर काही जणांची भीती व्यक्त केली. यामधील एका कर्मचाऱ्याला एईएफआय केंद्रात पाठविण्यात आले. दरम्यान, आज कोरोना लसीकरणाच्या दुसर्‍या दिवशी 17,072 लोकांना लसीचे डोस देण्यात आले. तर देशात आतापर्यंत एकूण 2,24,301 लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

दरम्यान, याबाबत दिल्लीचे आरोग्यमंत्री म्हणाले की, शनिवारी साईड इफेक्टसीची 51 किरकोळ प्रकरणे नोंदली गेली, त्यातील काहींना किरकोळ समस्या जाणवल्या. मात्र, एका आरोग्य कर्मचाऱ्याची तब्येत थोडी गंभीर होती. त्या कर्मचाऱ्याला एम्समध्ये दाखल केले आहे. या कर्मचाऱ्याचे वय 22 वर्षे असून तो सुरक्षा रक्षकाचे काम करतो. एकंदरीत, फक्त एकाला रुग्णालयात दाखल करावे लागले आणि उर्वरित 51 जणांना थोड्यावेळ तपासणी केल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला.
 

Web Title: covid vaccine govt says a total of 447 adverse events following immunisation reported 3 cases required hospitalisation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.