कोविड पुन्हा भारतात हातपाय पसरतोय; लसीच्या चौथ्या डोसची गरज आहे का? तज्ज्ञ सांगतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 05:25 PM2023-12-25T17:25:50+5:302023-12-25T17:29:22+5:30

आतापर्यंत लसीचे दोन डोस आणि बूस्टर डोस असे तीन वेळा लसीकरण करण्यात आले आहे

Covid is spreading again in India Is fourth dose of vaccine needed read what experts say | कोविड पुन्हा भारतात हातपाय पसरतोय; लसीच्या चौथ्या डोसची गरज आहे का? तज्ज्ञ सांगतात...

कोविड पुन्हा भारतात हातपाय पसरतोय; लसीच्या चौथ्या डोसची गरज आहे का? तज्ज्ञ सांगतात...

Corona virus 19 JN. 1, Covid19 Vaccination : संपूर्ण जगाला हैराण करणाऱ्या कोविडने आता हळूहळू पुन्हा डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. सध्या जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या एका महिन्यात कोविडची नवीन प्रकरणे 50 टक्क्यांनी वाढली आहेत. भारतात कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजारांच्या पुढे गेली आहे. काही राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. याशिवाय कोविडमुळे मृत्यूच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. कोविड प्रकरणांमध्ये वाढ होत असताना, लसीबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की ज्या लोकांनी कोरोनाचा बूस्टर डोस घेतला आहे, त्यांना पुढच्या म्हणजेच चौथ्या डोसची गरज आहे का?

Covid JN.1 च्या नवीन प्रकारामुळे प्रकरणे वाढत आहेत. भारतातही या प्रकाराची सुमारे ६३ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. केरळनंतर हा प्रकार अनेक राज्यांमध्ये पसरत आहे. अशा परिस्थितीत आता कोरोना लसीचा डोस घ्यावा की नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

लसीचा चौथा डोस आवश्यक आहे का?

देशातील SARS-CoV-2 Genomics Consortium म्हणजेच INSACOG चे प्रमुख एनके अरोरा यांच्या मते, सध्या देशात कोरोना लसीच्या चौथ्या डोसची गरज नाही. जरी प्रकरणे वाढत असली तरी, कोणताही गंभीर धोका नाही, तथापि, ज्या लोकांना कोणताही गंभीर आजार आहे किंवा ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत, ते खबरदारीचा उपाय म्हणून बूस्टर डोस घेऊ शकतात. पण ज्यांना कोणतीही समस्या नाही, त्यांना सध्या चौथा डोस घेण्याची गरज नाही.

डॉ. अरोरा म्हणाले की, कोरोनाच्या नवीन प्रकाराची लक्षणे साध्या फ्लूसारखीच आहेत. यामुळे कोणतीही गंभीर समस्या दिसून येत नाही. वाढती प्रकरणे पाहता, सर्व राज्यांना कोविड चाचणी आणि जीनोम अनुक्रम वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यामुळे व्हेरिएंटची नवी रूपं वेळेत ओळखता येतील. जेएन.१ प्रकार हा ओमिक्रॉनचा उपप्रकार आहे आणि भारतात तो फारसा धोकादायक दिसत नाही, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Covid is spreading again in India Is fourth dose of vaccine needed read what experts say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.