Covid-19 Vaccine ची टंचाई होणार दूर; FDA, WHO नं मंजुरी दिलेल्या लसी भारतात येण्याचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 06:37 PM2021-05-13T18:37:16+5:302021-05-13T18:40:32+5:30

Covid 19 Vaccine : FDA आणि WHO नं मंजुरी दिलेल्या लसीला भारतात आयातीसीठी १-२ दिवसात इम्पोर्ट लायसन्स मिळणार.

Covid-19 vaccine deficiency will go away; FDA, WHO approved vaccines pave way for India | Covid-19 Vaccine ची टंचाई होणार दूर; FDA, WHO नं मंजुरी दिलेल्या लसी भारतात येण्याचा मार्ग मोकळा

Covid-19 Vaccine ची टंचाई होणार दूर; FDA, WHO नं मंजुरी दिलेल्या लसी भारतात येण्याचा मार्ग मोकळा

Next
ठळक मुद्देFDA आणि WHO नं मंजुरी दिलेल्या लसीला भारतात आयातीलाठी १-२ दिवसात इम्पोर्ट लायसन्स मिळणार.देशातील लसींची कमतरता दूर होण्यास मिळणार मोठी मदत.

जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम १६ जानेवारीपासून भारतात सुरू करण्यात आला आहे. तर दुसरीकडे आता १ मेपासून १८ ते ४४ या वयोगटातील लोकांच्या लसीकरणालाही केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. परंतु अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा असल्याचं राज्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे काही राज्यांनी १८ ते ४४ या वयोगटातील लोकांचं लसीकरण तुर्तास थांबवून ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या परिस्थितीत नीति आयोगाकडून गुरूवारी मोठं वक्तव्य आलं आहे. आता एफडीए आणि डब्ल्यूएचओने मंजूर केलेली कोणतीही लस भारतात आणली जाऊ शकते, असं नीति आयोगाकडून सांगण्यात आलं. तसंच १ ते २ दिवसांच्या आत आयात परवाना दिला जाईल. सध्या कोणताही आयात परवाना प्रलंबित नाही, अशी माहिती नीति आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही.के.पॉल यांनी दिली. 

"डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी सोबत अन्य विभाग आणि परराष्ट्र मंत्रालय सातत्यानं फायझर, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सनच्या संपर्कात आहे," असं पॉल म्हणाले. ते लसींचे डोस निर्यात करतील का किंवा भारतात त्याचं उत्पादन करतील असं त्यांना विचारण्यात आलं आहे. या तिन्ही कंपमन्या जुले ते सप्टेंबर २०२१ या तिमाहीपर्यंत लस उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करत आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. भारतात लस उत्पादन करण्यासाठी कंपन्या पुढे येतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. याशिवाय कंपन्यांना देशातच भारतीय कंपन्यांसोबत लसीच्या उत्पादनासाठी बोलावण्यात आलं आहे. ऑगस्ट ते डिसेंबर महिन्यापर्यंत भारतात २१६ कोटी डोस उपलब्ध होतील, अशी अपेक्षाही पॉल यांनी व्यक्त केली. 

पुढील आठवड्यापासून स्पुटनिक उपलब्ध 

देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला असनाता दुसरीकडे लसींचा तुटवडा निर्माण झाल्यानं देशातील आरोग्य क्षेत्रात चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारनं निर्णायक पाऊल उचललं आहे. देशातील कोरोना लसींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवून सर्वांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. (Overall, 216 crore doses of vaccines will be manufactured in India between August-December - for India and for Indians)

रशियाने विकसित केलेली स्पुटनिक ही लस भारतात आली आहे. आता ही लस पुढील आठवड्यापासून बाजारांमध्ये उपलब्ध होईल. रशियातून मर्यादित स्वरूपात आलेला ही लस पुढच्या आठवड्यापासून उपलब्ध होईल, असे डॉ. पॉल यांनी सांगितले. दरम्यान, स्पुटनिक या लसीचे जुलै महिन्यापासून भारतात उत्पादन होईल, अशी माहितीही समोर आली आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Covid-19 vaccine deficiency will go away; FDA, WHO approved vaccines pave way for India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app