Corona Virus : सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 13:55 IST2025-06-06T13:54:45+5:302025-06-06T13:55:19+5:30

Corona Virus : भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार पुन्हा एकदा वेगाने होत आहे. कोरोनाच्या एक्टिव्ह रुग्णांची संख्या ५३०० पेक्षा जास्त झाली आहे.

covid 19 spike in india Corona Virus active cases climb to 5364 kerala maharashtra and delhi rise | Corona Virus : सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या

Corona Virus : सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या

भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार पुन्हा एकदा वेगाने होत आहे. कोरोनाच्या एक्टिव्ह रुग्णांची संख्या ५३०० पेक्षा जास्त झाली आहे. देशात पहिल्यांदाच कोरोना रुग्णांमध्ये अशी वाढ दिसून आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत सुमारे ५०० रुग्णांची वाढ झाली असून संख्या ५३६४ वर पोहोचली आहे, जी ५ जूनपर्यंत ४,८६६ होती. १५ दिवसांत कोरोनाचे एक्टिव्ह रुग्ण २० पटीने वाढले आहेत. २२ मे रोजी देशात कोरोनाच्या एक्टिव्ह रुग्णांची संख्या २५७ होती, जी आता ५३६४ वर पोहोचली आहे.

कोरोना व्हायरसचे नवनवीन व्हेरिएंट अनेक राज्यांमध्ये लोकांना वेगाने संक्रमित करत आहेत आणि विळखा घालत आहे. सर्वात वाईट परिस्थिती केरळमध्ये आहे, जिथे कोरोनाचे सर्वाधिक एक्टिव्ह रुग्ण आहेत. केरळमध्ये कोरोनाचे १६७९ रुग्ण आहेत, ज्यांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गुजरातमध्ये कोरोनाचे ६१५ एक्टिव्ह रुग्ण आहेत, पश्चिम बंगालमध्ये ५९६, दिल्लीत ५६२ आणि महाराष्ट्रात ५४८ रुग्ण आहेत.

धक्कादायक! ३ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, चिमुकल्यांसाठी किती घातक आहे नवा व्हेरिएंट?

कोरोना स्वरूप बदलतोय

सर गंगा राम हॉस्पिटलचे सीनिअर कंसलटेंट डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन प्रोफेसर डॉक्टर एम वली यांनी म्हटलं आहे की, कोरोनाचा नवीन व्हेरिएंट प्राणघातक नाही, परंतु तो वेगाने पसरत आहे. आवश्यकता नसल्यास, घराबाहेर पडू नका. स्वच्छता ठेवा आणि मास्क घाला. यासाठी कोणत्याही लसीची आवश्यकता नाही. जर  अंगदुखी, खोकला आणि ताप अशी लक्षणं आढळली तर नक्कीच डॉक्टरांना भेटा. घाबरण्याची गरज नाही. कोरोना त्याचं स्वरूप बदलत आहे. काळजी करण्याची काहीच गरज नाही. सिंगापूर, हाँगकाँग आणि चीनमध्ये हे जास्त आहे. जर तुम्ही आंतरराष्ट्रीय प्रवास करत असाल तर सावधगिरी बाळगणं आणि मास्क घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कोरोनावर उपचार कसे करावे हे माहिती आहे म्हणून घाबरण्याची गरज नाही.

कोरोना वाढतोय मास्क तर लावाच, 'या' ५ उपायांनी वाढवा प्रतिकारशक्ती-इन्फेक्शनचा धोका टाळा

सावधगिरी बाळगण्याची गरज 

कोरोना व्हायरसबाबतची परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे, परंतु आरोग्य अधिकाऱ्यांनी लोकांना सावधगिरी बाळगण्याचं आणि आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणं, वारंवार हात धुणं आणि कोरोनाची लक्षणं आढळल्यास ताबडतोब चाचणी करणं महत्त्वाचं आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे आणि अनेक राज्यांमध्ये संसर्ग वाढला आहे. सरकार आणि आरोग्य विभागाने लोकांना सावधगिरी बाळगण्याचे, मास्क घालण्याचे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचे आणि आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
 

Web Title: covid 19 spike in india Corona Virus active cases climb to 5364 kerala maharashtra and delhi rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.