जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 07:26 IST2025-10-28T07:25:24+5:302025-10-28T07:26:09+5:30
न्यायालयाने दिल्ली पोलिसांना आजपर्यंत दिलेल्या पर्याप्त वेळेबाबतही फटकारले.

जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
नवी दिल्ली : २०२० मध्ये दिल्ली दंगल घडवून आणण्याच्या कटकारस्थानातील संशयित आरोपी उमद खालिद, शार्जिल इमाम, गुलफिशा फातिमा व मीरान हैदर यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी आता सर्वोच्च न्यायालयात ३१ ऑक्टोबरला होणार आहे. न्यायालयाने दिल्ली पोलिसांना आजपर्यंत दिलेल्या पर्याप्त वेळेबाबतही फटकारले. आम्ही तुम्हाला खूप वेळ दिला आहे. हा विषय आम्हाला संपवायचा आहे. अगदी स्पष्टच सांगायचे म्हणजे जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे न्या. अरविंद कुमार व न्या. एन. व्ही. अंजारिया यांच्या पीठाने स्पष्ट केले.
या प्रकरणाचा इतिहास
२०२० साली दिल्लीमध्ये दंगल होऊन त्यात ५३ नागरिक ठार झाले होते. ही दंगल अशा वेळी झाली जेव्हा देशभरात नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदणी या दोन वादग्रस्त कायद्यावरून उग्र आंदोलने सुरू झाली होती.
दिल्ली पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात कटकारस्थानाचे गुन्हे दाखल केले. कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेशिवाय हे आरोपी पाच वर्षे तुरुंगात असल्याचे आरोपींच्या वकिलांचे म्हणणे आहे.