शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

पत्नीच्या रूममध्ये एसी लावण्याचे कोर्टाने पतीला दिले आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 11:11 AM

एका न्यायालयाने कौटुंबिक वादावर सुनावणी करताना पत्नीच्या रूममध्ये एसी लावून तिला दरमहा दहा हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश पतीला दिले आहेत.

गाझियाबाद - येथील एका न्यायालयाने कौटुंबिक वादावर सुनावणी करताना पत्नीच्या रूममध्ये एसी लावून तिला दरमहा दहा हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश पतीला दिले आहेत. तसेच  कुटुंब कल्याण केंद्राच्या महिला कॉन्स्टेबलने दर आठवड्याला या महिलेच्या घरी जाऊन तिच्या खुशालीची चौकशी करून त्याची माहिती न्यायालयाला देण्याचे आदेशही न्यायालाने दिले आहेत. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार मानसी विहार येथे राहणाऱ्या एका तरुणीचा विवाह 2013 साली एका बँकेत व्यवस्थापक म्हणून काम पाहणाऱ्या तरुणाशी झाला होता. मात्र लग्नाला काही वर्षे उलटूनही मुलबाळ न झाल्याने सदर तरुणीच वांझोटी ठरवून सासरच्यांनी छळ करण्यास सुरुवात केली. तिला घराबाहेर काढून नोकरांच्या खोलीत ठेवले गेले. तसेच तिच्यावर घटस्फोटासाठीही दबाव आणला गेला. ही बाब समजल्यावर या तरुणीने न्यायालयात धाव घेतली. तसेच पोटगीचा खटला दाखल केला. तसेच आपल्या खोलीत एसी लावण्याची तसेच दरमहा दहा हजार रुपये पोटगी देण्याची मागणी केली होती. मात्र सदर महिलेच्या पतीने या महिलेवरच आपले आणि आपल्या कुटुंबीयांचे ऐकत नसल्याचा आरोप करत घटस्फोटाची मागणी केली होती. अखेर दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकल्यावर न्यायालयाने पतीचा दावा फेटाळून लावला. तसेच सदर महिलेच्या रूममध्ये एसी लावण्याचे तसेच तिला दरमहा खर्चासाठी दहा हजार रुपये देण्याचे आदेश दिले.   

टॅग्स :Courtन्यायालयFamilyपरिवारnewsबातम्या