शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

कोर्टमार्शल! पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या जवानावर भारतीय लष्कराची कठोर कारवाई, सुनावली अशी शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 1:22 PM

Indian Army: भारतीय लष्कराने पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या एका जवानावर कठोर कारवाई केली आहे. लष्कराने या जवानाला पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

भारतीय लष्कराने पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या एका जवानावर कठोर कारवाई केली आहे. लष्कराने या जवानाला पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्याला नोकरीवरूनही बडतर्फ करण्यात आले आहे. दिल्ली कँटमध्ये कोर्टमार्शल केल्यानंतर लष्कराने ही शिक्षा सुनावली आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार आरोपी जवान नायक रँकचा असून, तो राजपुताना रेजिमेंटच्या २२व्या बटालियनमध्ये होता. सध्या त्याची तैनाती ही राजपुताना रायफल्सच्या  रेजिमेंटल सेंटरमध्ये होती. कोर्टमार्शलदरम्यान, आरोपी जवानाने पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणेला गोपनीय माहिती लीक केल्याचा आरोप मान्य केला आहे. तसेच ऑफिशिल सिक्रेट्स अॅक्ट १९२३ अन्वये ठेवण्यात आलेले आरोप मान्य केले आहेत.

रिपोर्टनुसार आरोपी जवानाने आयएसआयला भारतीय लष्कराच्या जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमधील तैनातीपासून ते युनिटपर्यंतची माहिती दिली होती. त्याशिवाय त्याने त्याच्या आर्मी यूनिटच्या एक्सरसाइजशी संबंधित बरीचशी गोपनीय माहिती पाकिस्तानपर्यंत पोहोचवली होती. तसेच त्याने भारतीय लष्कराच्या वेगवेगळ्या रेजिमेंट्सची मुव्हमेंट, त्यांच्या फॉर्मेशनशी संबंधित माहिती तसेच फोटोग्राफसुद्धा आयएसआयकडे सोपवले होते.

एवढंच नाही तर त्याने सर्व कमांडिंग ऑफिसरपासून बॅटल फॉर्मेशन कमांडरपर्यंतची यादी तयार केली होती. त्याने केलेल्या मेसेजमधून त्याने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेकडे या बदल्यात पैशांची मागणी केल्याचे उघड झाले आहे. या जवानावर पहिला आरोप आर्मी अॅक्टमधील सेक्शन ६९ अन्वये ठेवण्यात आला होता. त्यामध्ये आरोपी जवानाने फेब्रुवारी २०१९ आणि एप्रिल २०२० मध्ये व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कुठल्यातरी अनोळखी मोबाईल नंबरसोबत संभाषण केले आणि शत्रूला मदत होईल अशी लष्कराशी संबंधित संवेदनशील माहिती पुरवली होती, असे त्यात म्हटले होते.

याचप्रमाणे दुसऱ्या आरोपामध्ये लष्कराची संवेदनशील माहिती गोळा केल्याचा आरोप केला होता. तसेच जनरल स्टाफ ऑफिसर ग्रेड १ रँकच्या अधिकाऱ्याच्या फेक स्टॅम्पपासून ते इतर संवेदनशील वस्तू जप्त करण्यात आल्याचा उल्लेख होता. याशिवाय त्याच्यावर लष्कराच्या नियमांविरुद्ध चेन मार्केटिंग कंपन्यांमध्ये सहभागी झाल्याचा आरोप करण्यात आला होता.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानDefenceसंरक्षण विभागISIआयएसआय