न्यायालय बीसीसीआय

By Admin | Updated: December 16, 2014 23:44 IST2014-12-16T23:44:15+5:302014-12-16T23:44:15+5:30

व्यावसायिक हितसंबंध जोपासणाऱ्यांची यादी द्या

Court BCCI | न्यायालय बीसीसीआय

न्यायालय बीसीसीआय

ोला : निर्मल भारत अभियानाअंतर्गत निर्माल ग्राम योजना राबविली जाते. या योजनेसाठी अकोला जिल्‘ातील १६ गावांचे प्रस्ताव होते, मात्र यातील सर्वच कामे केंद्रीय मूल्यमापन समितीने अपात्र ठरविली आहे. त्यामुळे निर्मल ग्राम योजनेत अकोला नापास ठरले आहे.
निर्मल ग्राम योजनेसाठी २0१३-१४ या वर्षाकरिता अकोला तालुक्यातील डोंगरगाव, खडकी बु., पातूर तालुक्यातील अंबाशी, चान्नी, मळसूर, तळेगाव पा., वारखेड, आकोट तालुक्यातील बोर्डी, देऊळगाव, पणज, सावरा, तरोडा, बाळापूर तालुक्यातील मांडोली, बार्शीटाकळी तालुक्यातील कोथळी बु., तर मूर्तिजापूर तालुक्यातील बिडगाव आणि सोनोरी ही गावे विभागीय समितीने पात्र ठरविली होती. त्यानंतर केंद्रीय समितीकडून या गावांची पाहणी करण्यात आली. तीन गावांची माहितीच ऑनलाइन झाली नाही. त्यामुळे ही गावे आधीच अपात्र ठरली होती. उर्वरित १३ गावांनाही अपात्र ठरविण्यात आले. (प्रतिनिधी)
......
सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनात पडले कमी
निर्मल ग्राम पुरस्कारासाठी प्रस्तावित गावांमध्ये सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाची कोणतीही सुविधा नसल्यामुळे ही गावे केंद्रीय पथकाकडून अपात्र ठरविण्यात आली आहेत. या ठिकाणी ही गावे कमी पडल्यामुळे स्पर्धेत बाद झालो असल्याची कबुली पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. के. कुळकर्णी यांनी दिली.
...................
एका व्यक्तीच्या चुकीने गाव अपात्र
बाळापूर तालुक्यातील मांडोली हे गाव केंद्रीय पथकाच्या पाहणीमध्ये सर्वच निकषांवर पात्र ठरणार होते; मात्र एका व्यक्तीच्या चुकीने निर्मल पुरस्कारापासून वंचित राहिले आहे. पथकाने पाहणी केली, त्या दिवशी गावातील कुणी तरी एका व्यक्तीने रस्त्यावर शौच केली होती. ही बाब पथकाच्या लक्षात आल्याने त्यांनी गाव अपात्र ठरविल्याची माहिती आहे.
..................

Web Title: Court BCCI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.