बापरे! नवऱ्यासोबत नवरी करत होती फोटोशूट; अचानक रंगीबेरंगी फटाका फुटला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 19:21 IST2025-03-21T19:20:37+5:302025-03-21T19:21:03+5:30

विक्की आणि पिया यांनी त्यांना आलेला अनुभव शेअर करत लोकांना जागरूक राहण्याचा सल्ला दिला आहे.

couple wedding photoshoot in Bengaluru turns tragic when a colour bomb accident left bride injured | बापरे! नवऱ्यासोबत नवरी करत होती फोटोशूट; अचानक रंगीबेरंगी फटाका फुटला अन्...

बापरे! नवऱ्यासोबत नवरी करत होती फोटोशूट; अचानक रंगीबेरंगी फटाका फुटला अन्...

बंगळुरू - कॅनडाहून आलेल्या मूळ भारतीय जोडप्याच्या लग्नसोहळ्यात भयंकर दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे कुटुंबाच्या आनंदात विरजण पडलं आहे. बंगळुरू येथे लग्नाचे फोटोशूट करताना एक रंगाचा फटाका चुकून फुटल्याने त्यात नवरी जखमी झाली आहे. त्यामुळे लग्नाच्या सुंदर आठवणी काही क्षणात धक्कादायक आठवणीत बदलल्या आहेत. लग्नात फटाके आणि आतषबाजी करणे किती धोक्याचं ठरू शकते हे या दुर्घटनेवरून दिसून येते.

कसा झाला अपघात?

कॅनडाहून विक्की आणि पिया त्यांच्या लग्नासाठी बंगळुरूत आले होते. लग्नासाठी दोन्ही कुटुंबात मोठा आनंद आणि उत्साह होता. या लग्नातील फोटो काही खास बनवण्याचं प्लॅनिंग होते. त्यासाठी हवेत रंगीबेरंगी धूर सोडणाऱ्या फटाक्यांचा वापर करण्याचा निर्णय झाला. फोटोला रंगीत बॅकग्राऊंड बनवण्यानं ते आणखी सुंदर दिसतात. जेव्हा फोटोग्राफर फोटो काढतील तेव्हा जोडप्याच्या बॅकग्राऊंडला फटाके फुटतील असं ठरलं होते. परंतु प्रत्यक्षात हे घडलेच नाही आणि ठरवलेलं प्लॅनिंग जीवावर बेतलं.

फोटोशूटवेळी नवरा नवरीला उचलणार होता तितक्याच एक दुर्घटना घडली. रंगाचे फटाके बॅकग्राऊंडला सुरक्षित फुटणार होते परंतु ते कपलच्या दिशेने आले, त्यात नवरी पिया फटाक्यात झालेल्या स्फोटात अडकली, या फटाक्यामुळे नवरीची पाठ भाजली आणि केसही जळले. ही भयानक घटना घडल्यानंतर सगळीकडे सन्नाटा पसरला. 


कपलनं शेअर केला अनुभव

पिया आणि विक्की यांनी हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. त्यात पियाला झालेल्या जखमा स्पष्टपणे दिसतायेत. इन्स्टाग्रामवर त्यांनी लिहिलं की, आम्ही कधी विचार केला होता, रंगाचे फटाके फुटतील आणि आपला जबरदस्त फोटो येईल परंतु ते चुकीचे ठरले. लग्नाच्या आनंदाच्या वातावरण एक वेदनादायी अनुभव आला. या घटनेनंतर जखमी नवरीला तातडीने हॉस्पिटलला नेण्यात आले. ही घटना लग्न आणि रिसेप्शन यामध्ये घडली. या घटनेमुळे संपूर्ण दिवस बर्बाद झाला. आम्ही कॅनडातून बंगळुरूला लग्नासाठी आलो होतो असं त्यांनी सांगितले.

दरम्यान, विक्की आणि पिया यांनी त्यांना आलेला अनुभव शेअर करत लोकांना जागरूक राहण्याचा सल्ला दिला आहे. लग्नात फटाके, आतषबाजी याचा वापर करणं किती धोक्याचे ठरू शकते हे सांगितले. सध्याच्या लग्न समारंभात या गोष्टींचा वापर वाढला आहे. सुरक्षा उपाययोजना न करता हे वापरले जातात. फटाके, रंगीत धूर भलेही दिसण्यास आकर्षक असतील परंतु त्याने गंभीर धोकाही निर्माण होऊ शकतो असं कपलने म्हटलं आहे.

Web Title: couple wedding photoshoot in Bengaluru turns tragic when a colour bomb accident left bride injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.