शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देशात २६३ लाख टन साखर उत्पादन होईल : प्रकाश नाईकनवरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 20:20 IST

केंद्र सरकारने दिली ६० लाख टन साखर निर्यातीची परवानगी

ठळक मुद्देनिर्यातीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहनगेल्यावर्षीचा शिल्लकी साखरेचा १४४ लाख टनांहून अधिक साठाकच्च्या साखरेचा प्रतिक्विंटल दर १९०० आणि पांढऱ्या साखरेचा भाव २२०० रुपये

पुणे : गेल्या दोन हंगामातील उच्चांकी साखर उत्पादनानंतर यंदा देशातील साखर उत्पादन २६३ लाख टनापर्यंत खाली येईल. गेल्यावर्षीचा शिल्लकी साखरेचा १४४ लाख टनांहून अधिक साठा आहे. मार्चपर्यंत ब्राझिल आणि ऑस्ट्रेलियातील साखर बाजारात येणार नाही. या संधीचा फायदा घेत कारखान्यांनी निर्यात केली पाहिजे, असे आवाहन साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी केले. मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या पुरस्कार वितरण समारंभापुर्वी त्यांनी ही माहिती दिली. ‘गेल्यावर्षीच्या हंगामामधे देशात तब्बल ३३१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. महाराष्ट्र आणि कर्नाटकात अतिवृष्टीमुळे उसाची मोठी हानी झाली. त्यामुळे यंदा राज्यासह देशातील साखर उत्पादन २६३ लाख टनापर्यंत घसरेल असा अंदाज आहे. गेल्यावर्षीचे १४४.३ लाख टन साखर शिल्लक आहे. देशाचा वार्षिक खप हा २६० लाख टन इतका आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामधे कच्च्या साखरेचा प्रतिक्विंटल दर १९०० आणि पांढऱ्या साखरेचा भाव २२०० रुपये आहेत. ब्राझिल आणि इतर देशातील साखर मार्च नंतर बाजारात येईल. त्यामुळे ही संधी कारखान्यांनी सांधली पाहिजे, असे नाईकनवरे म्हणाले. केंद्र सरकारने ६० लाख टन साखर निर्यातीची परवानगी दिली आहे. त्या पैकी २४ लाख टन साखर निर्यातीचे करार झाले आहेत. मात्र, त्यातील १५ ते १६ लाख टनांचे करार एकट्या उत्तरप्रदेशातील कारखान्यांनी केले आहेत. साखरेचे पोते हे बँकेकडे तारण असते. त्यापोटी बँक किंमतीच्या ८५ टक्के रक्कम कारखान्यांना देते. त्यामुळे निर्यातीस अडचण येत आहे. गेल्या वर्षी प्रमाणेच कारखान्यांना ब्रिज लोन देण्याची गरज असल्याचे नाईकनवरे म्हणाले. ----------------------किमान विक्री दरात होणार बदल केंद्र सरकारने गेल्या हंगामामधे साखरेचा किमान विक्री दर ३१०० रुपये प्रतिक्विंटल इतका निश्चित केला आहे. मात्र, हा दर ठरविताना बँक खर्चाचा विचार केला गेला नाही. केंद्र सरकारने त्याचा आढावा घेण्याचे मान्य केले असून, किमान विक्री दर ३३०० रुपये प्रतिक्विंटल पर्यंत वाढतील, असे साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीGovernmentसरकार