देश-परदेश : संरक्षक ओझोन थराची हानी करणार्या नव्या वायूंत वाढ
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:17+5:302015-02-18T00:13:17+5:30
लंडन : ओझोन थराची झीज करणार्या काही रसायनांत मोठी वाढ झाल्याने पृथ्वीचे सुरक्षा कवच असलेल्या या थराला धोका निर्माण झाला आहे. एका नव्या अध्ययनात ही बाब आढळून आली. ही अशी रसायने आहेत जी संयुक्त राष्ट्राच्या मॉन्ट्रियल करारांतर्गत नियंत्रित करता येत नाहीत.

देश-परदेश : संरक्षक ओझोन थराची हानी करणार्या नव्या वायूंत वाढ
ल डन : ओझोन थराची झीज करणार्या काही रसायनांत मोठी वाढ झाल्याने पृथ्वीचे सुरक्षा कवच असलेल्या या थराला धोका निर्माण झाला आहे. एका नव्या अध्ययनात ही बाब आढळून आली. ही अशी रसायने आहेत जी संयुक्त राष्ट्राच्या मॉन्ट्रियल करारांतर्गत नियंत्रित करता येत नाहीत. यातीलच एक म्हणजे व्हीएसएलएस. अत्यंत कमी जीवनमान असलेल्या या रसायनाची हवेतील मात्रा वेगाने वाढत आहे. युनिव्हर्सिटी ऑफ लीड्सच्या स्कूल ऑफ अर्थ अँड एन्व्हायर्नमेंटच्या अध्ययनाचे प्रमुख लेखक डॉ. रेयान हुसैनी म्हणाले की, व्हीएसएलएसचे नैसर्गिक व औद्योगिक असे दोन्ही स्रोत असू शकतात. व्हीएसएलएसच्या उत्पादनावर संयुक्त राष्ट्राच्या मॉन्ट्रियल करारांतर्गत नियंत्रण नाही. कारण, पूर्वी ओझोन थराच्या झिजेत या रसायनाची भूमिका खूपच अल्प होती. मात्र, आता या रसायनाची मात्रा वेगाने वाढत असून ही वाढ अशीच सुरू राहू दिली, तर मॉन्ट्रियल कराराद्वारे ओझोन थराचे रक्षण करण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न निष्फळ ठरण्याची शक्यता आहे. हे अध्ययन नेचर जियोसायन्स या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.