देश-परदेश : भूकंपाने जपानमध्ये किरकोळ त्सुनामी
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:18+5:302015-02-18T00:13:18+5:30
भूकंपाने जपानमध्ये

देश-परदेश : भूकंपाने जपानमध्ये किरकोळ त्सुनामी
भ कंपाने जपानमध्ये किरकोळ त्सुनामीटोकियो : समुद्रातील भीषण भूकंपामुळे जपानच्या उत्तर भागात सोमवारी किरकोळ त्सुनामी आली. याच भागात २०११ मध्ये त्सुनामीने भयंकर विध्वंस घडवून आणला होता. पूर्वेकडील इवाते प्रांतात सकाळी २० सेंटीमीटर उंचीच्या लाटांची नोंद झाली आहे. जपान हवामानशास्त्र संस्थेने (जेएमए) एक मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तविली होती. भूकंपामुळे कुजीत लाटा उसळत आहेत. मात्र, त्यांचा वेग व उंची अधिक वाढण्याची शक्यता नाही. इवाते प्रांताच्या इतर किनार्यांवर १० सेंटिमीटर उंचीच्या लाटांची नोंद झाली. तूर्तास कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही. किनार्याजवळ सागरी पाणिपातळीमध्ये थोडीही वाढ झाल्याचे दिसत नाही. परिसरातील बंदरातही बदल दिसून आला नाही. सकाळी आठ वाजून सहा मिनिटांनी भूकंप झाला. मियाकोपासून २१० कि. मी. पूर्वेकडे प्रशांत महासागरात १० कि. मी. खोलीवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. २०११च्या भूकंपाने घडवून आणलेल्या भीषण विध्वंसाच्या दृष्टिकोनातून भूशास्त्रज्ञ परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. इवातेतील स्थानिक अधिकार्यांनी १९ हजार लोकांना किनारपट्टी भागातून इतरत्र जाण्यास सांगितले आहे. २०११ मधील त्सुनामीने किनारपट्टीवरील ज्या भागात विध्वंस घडवून आणला होता, ज्या भागातील नागरिकांना स्थलांतरित होण्याचे निर्देश देण्यात आले त्याच भागात २०११च्या त्सुनामीने १८ हजार लोकांचा बळी घेतला होता.