शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

देशभरातील बनावट नोटांचा उपद्रव थांबता थांबेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 06:18 IST

गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त चलन जप्त

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : नोटाबंदीनंतरही सरकार बनावट चलनी नोटांचा उपद्रव पूर्णपणे बंद करू शकले नाही. गृह मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाकडील (एनसीआरबी) माहितीनुसार २०१७ मध्ये देशभर असलेल्या बनावट नोटांपैकी २८.१० कोटी रूपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या गेल्या. २०१६ च्या तुलनेत या नोटा ४.५ कोटींपेक्षा जास्त होत्या.

एनसीआरबीच्या सोमवारी झालेल्या अहवालात म्हटले आहे की, २०१७ मध्ये एकूण ३५५९९४ बनावट नोटा पकडल्या गेल्या. एकूण ९७८ गुन्हे नोंद झाले व त्यात १०४६ लोकांना आरोपी बनवले गेले. पकडल्या गेलेल्या एकूण नोटांत ७४८९८ नोटा २००० आणि १००० रूपयाच्या ६५७३१ होत्या. याशिवाय ५०० च्या८८७९२०० रूपयांच्या ८३५ आणि १०० रूपयांच्या ९२७७८ बनावट नोटा पकडल्या गेल्या. जप्त झालेल्या नोटांमध्ये चलनातून बाद झालेल्या ५०० रूपयांच्या १०२८१५ नोटाही होत्या.

सर्वाधिक नोटा पकडल्या गुजरातमध्ये

सगळ्यात जास्त ९०,०८, ८८५० रूपयांच्या बनावट नोटा गुजरात राज्यात पकडल्या गेल्या. त्यानंतर उत्तर प्रदेशातून २८,६४,९८६० कोटी आणि पश्चिम बंगालमधून १९३६६०७० कोटी रूपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या गेल्या. महाराष्ट्रात एकूण ९०६४ बनावट नोटा पकडल्या गेल्या. त्यांचे मूल्य ५२३९६५० रूपये होते. राज्यात ७५ गुन्हे दाखल झाले व ६२ जण आरोपी बनवले गेले.

सरकारने संसदेत २०१६ मध्ये २४.६१ कोटी रूपयांच्या बनावट नोटा जप्त केल्याचे गेल्या काही दिवसांपूर्वी सांगितले होते. २०१७ मध्ये पकडल्या गेलेल्या २८.१० कोटी रूपयांच्या तुलनेत या नोटा ४.५ कोटी रूपये कमी मूल्यांच्या होत्या.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकGujaratगुजरातUttar Pradeshउत्तर प्रदेश