कोंढव्यात पकडल्या बनावट नोटा

By Admin | Updated: April 13, 2015 23:53 IST2015-04-13T23:53:09+5:302015-04-13T23:53:09+5:30

पुणे : कोंढवा पोलिसांनी एक लाख रुपयांच्या बनावट नोटा पकडल्या असून याप्रकरणी पश्चिम बंगाल येथील तरुणाला अटक करण्यात आली आहे.

Counterfeit currency caught in Kondhav | कोंढव्यात पकडल्या बनावट नोटा

कोंढव्यात पकडल्या बनावट नोटा

णे : कोंढवा पोलिसांनी एक लाख रुपयांच्या बनावट नोटा पकडल्या असून याप्रकरणी पश्चिम बंगाल येथील तरुणाला अटक करण्यात आली आहे.
इब्राहीम गौस महमद शेख (वय २०, रा. चौधरीपाडा, मालदार, प. बंगाल) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक राहुल कारभारी यांनी फिर्याद दिली आहे. शेख हा बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला कोंढव्यातील तालाब कंपनीच्यासमोरील पीएमपी बसथांब्यासमोरुन ताब्यात घेतले. त्याच्याकडे ५०० रुपयांच्या २०० बनावट नोटा आढळून आल्या. पुढील तपास उपनिरीक्षक राहुल कारभारी करीत आहेत.
-------
मानेवर वार करुन तरुणाचा खून
पुणे : गळ्यावर धारदार हत्याराने वार करुन खून केल्यानंतर मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून देण्यात आला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
सद्दामअली सुरजअली शेख (वय २०, रा. लकी मटण शॉपजवळ, लोहगाव) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ताजउद्दीन अब्दुल मोहमद अजित (रा. लकी मटण शॉप, लोहगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुकुर शेख (वय २५, रा. सुमितपुर, आसाम) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीने शनिवारी संध्याकाळी सात ते रविवारी दुपारी अडीचच्या दरम्यान मटण दुकानातच झालेल्या भांडणामधून सद्दामअलीचा खून केला. त्याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खून करुन मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी पाण्याच्या टाकीमध्ये टाकून पळून गेला. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर करीत आहेत.

Web Title: Counterfeit currency caught in Kondhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.