कौटुंबिक न्यायालयात समुपदेशन गरजेचे
By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:49+5:302015-08-08T00:23:49+5:30
निलम गो-हे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कौटुंबिक न्यायालयात समुपदेशन गरजेचे
न लम गो-हे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र पुणे : कौटुंबिक अस्वस्थतेमधून आईने मुलांचा खून केल्याची घटना पुण्यात घडली आहे. हा गंभीर प्रकार असून, त्याची सखोल चौकशी करावी. सुशिक्षित असूनही मुलाला बेदम मारहाण केल्यामुळे राखी बालपांडे यांना कठोर शिक्षा करण्यात यावी. यापुढे कौटुंबिक कलहामुळे मुलांचा नाहक बळी जावू नये. त्यासाठी कौटुंबिक न्यालयात समुपदेशन यंत्रणा उभारण्यात यावी. त्याठिकाणी बालमानस शास्त्रज्ञ यांची नियुक्त करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या आमदार निलम गो-हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शुक्रवारी केली. ------------------------