खोकला घालवणारे औषध की बाटलीत विषाचा डोस?; ५० हून अधिक कंपन्यांचे कफ सीरप नापास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 06:18 AM2023-12-05T06:18:07+5:302023-12-05T06:18:34+5:30

भारतात उत्पादित कफ सिरपमुळे जगभरात एकूण १४१ मुलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त यापूर्वीच येऊन गेलेले आहे.

Cough medicine or a dose of poison in a bottle?; More than 50 companies' cough syrups fail | खोकला घालवणारे औषध की बाटलीत विषाचा डोस?; ५० हून अधिक कंपन्यांचे कफ सीरप नापास

खोकला घालवणारे औषध की बाटलीत विषाचा डोस?; ५० हून अधिक कंपन्यांचे कफ सीरप नापास

नवी दिल्ली :  भारतात विकल्या जाणाऱ्या ५० पेक्षा अधिक कंपन्यांचे कफ सीरप (खोकल्याचे औषध) गुणवत्ता चाचणीत नापास झाल्याचे सरकारी अहवालातून समोर आले. 

गेल्या वर्षी उझबेकिस्तानात कफ सिरप प्राशनाने १९ मुलांचा मृत्यू झाला होता. हा सीरप दिल्लीजवळील नोएडातील एका कंपनीने बनविला होता, अशी माहिती समोर आली होती.  भारतात उत्पादित कफ सिरपमुळे जगभरात एकूण १४१ मुलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त यापूर्वीच येऊन गेलेले आहे. आता सिरपच्या निकृष्ट गुणवत्तेचे असल्याचे समोर आले. 

मुंबईतील १० कंपन्यांचे  नमूने आढळले सदोष
गुजरातमध्ये विश्लेषण केलेल्या ३८५ नमुन्यांतील २० उत्पादकांचे ५१ नमूने नापास झाले.
मुंबईतील औषधी प्रयोगशाळेने ५२३ नमुन्यांचे विश्लेषण केले. त्यातील १० कंपन्यांचे १८ नमूने नापास झाले. 

Web Title: Cough medicine or a dose of poison in a bottle?; More than 50 companies' cough syrups fail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.