शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याचा खर्च केंद्र करणार, प्रतिदिन 13 लाख लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 5:21 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : येत्या १६ तारखेपासून सुरू होणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचा संपूर्ण खर्च केंद्र सरकारतर्फे केला जाईल. या मोहिमेत तीन कोटी लोकांना लस दिली जाणार असून त्यात कोरोना योद्धे आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. लोकप्रतिनिधींचा या मोहिमेत समावेश नसेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी स्पष्ट केले. लसीकरण मोहिमेच्या सज्जतेसंदर्भातील आढावा बैठकीत ते बोलत होते. १६ जानेवारीपासून देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आभासी बैठकीद्वारे संवाद साधला.

पहिली ऑर्डर सीरमकडे केंद्र सरकार कोविशिल्डचे १ कोटी १० लाख डोस खरेदी करणार असून त्यासंदर्भातील ऑर्डर सीरमकडे नोंदवण्यात आली असल्याची माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी दिली. प्रत्येक डोसचा खर्च २०० रुपये येणार असल्याचे पूनावाला म्हणाले.

सरकारचे टार्गेट : ऑगस्टपर्यंत देणार ३० कोटी लोकांना डोस 

13 लाख लोकांना प्रतिदिन लस

कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लस देण्याच्या मोहिमेला आता चार दिवसांनी सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन कोटी लोकांना लस देण्याचे नियोजन आहे. या तीन कोटींमध्ये कोणाचा समावेश असेल याचीही निश्चिती झाली आहे. या सर्व लसीकरण मोहिमेसाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाला प्रशिक्षित करण्यात आले आहे. एकूणच मोठा जंगी कार्यक्रम होणार आहे. शिवाय ऑगस्ट महिन्यापर्यंत ३० कोटी लोकांना लस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पाहू या काय आहे या सर्व नियोजनात...

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCorona vaccineकोरोनाची लस