कोराडी पॉवर हाऊसमध्ये तोडफोड
By Admin | Updated: July 31, 2015 23:54 IST2015-07-31T23:54:45+5:302015-07-31T23:54:45+5:30

कोराडी पॉवर हाऊसमध्ये तोडफोड
>नागपूर : स्थानिक लोकांना रोजगारांपासून डावलले जात असल्याचा आरोप करून तोडफोड करणाऱ्या आरोपींना कोराडी पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे कोराडीतील कामगारात भीतीचे वातावरण आहे. स्थानिकांना काम दिले जात नसल्याचा आरोप करून लाठ्याकाठ्या घेऊन काही आरोपी रत्नदीप रंगारी गुरुवारी सकाळी १० वाजता आपल्या साथीदारांसह कोराडी पॉवर हाऊसच्या परिसरात शिरला. त्याने तेथील साहित्याची तोडफोड केली. एवढेच नव्हे तर रोखण्याचा प्रयत्न केला असता आतमधील कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. व्यवस्थापक अनुराग शुक्ला यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचा ताफा पोहचताच आरोपी पळू लागले. त्यातील रंगारी छोटू लाखे आणि राकेश बन्सोडसह १५ जणांवर पोलिसांनी विविध प्रकारचे गुन्हे दाखल केले. त्यातील नेमके किती अटक करण्यात आले. त्याची माहिती स्पष्ट होऊ शकली नाही.---