हरियाणात सरकारी नोकर भरतीच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार : कॉंग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 10:22 AM2019-06-10T10:22:02+5:302019-06-10T10:35:20+5:30

हरियाणामध्ये मनोहरलाल खट्टर यांची सत्ता आल्यापासून राज्यातील सरकारी नोकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार वाढला आहे.

corruption on Haryana government servant recruitment | हरियाणात सरकारी नोकर भरतीच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार : कॉंग्रेस

हरियाणात सरकारी नोकर भरतीच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार : कॉंग्रेस

Next

नवी दिल्ली - हरियाणात लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षा  व सरकारी  भरतीत मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप  कॉंग्रेसकडून होत आहे. या भरतीत मोठ्या प्रमाणात विसंगती आहेत. यामुळे सर्व भरती झालेल्या उमेदवारांच्या गुणांची तपासणी झाली पाहिजे आणि निकाल सार्वजनिकरित्या जाहीर केला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.

हरियाणामध्ये मनोहरलाल खट्टर यांची सत्ता आल्यापासून राज्यातील सरकारी नोकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार वाढला आहे. पारदर्शक असल्याचा दावा करणाऱ्या सरकार मध्ये नोकरभरतीत घोटाळे होत आहे. रोज नवनवीन घोटाळे समोर येत असताना सरकार यावर कोणतेही प्रतिकिया देत नाही. त्यामुळे सुशिक्षित तरुण बेरोजगारांना याचा फटका बसत असल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला. हरियाणाच्या युवकांचे भविष्य अंधारात आहे. भाजप सरकार खरे असेल तर त्यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या २२ मे २०१४ च्या निकालानुसार लेखी परीक्षेत आणि मुलाखतीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांचे गुण सार्वजनिकरित्या जाहीर केले पाहिजेत अशी मागणी सुरजेवाला यांनी केली.

 

हरियाणा स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या भर्तीत झालेल्या घोटाळ्यावरून चौकशी करण्यासाठी सरकार जाणीवपूर्वक  उशीर करत आहे. मात्र कॉंग्रेस सत्तेत आल्यास या प्रकरणी निष्पक्षपणे चौकशी केली जाईल आणि दोषींना जेलमध्ये पाठवण्यात येईल असे, सुरजेवाला म्हणाले.

 

 

 

Web Title: corruption on Haryana government servant recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.