शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

'सुधरा, अन्यथा तुमचाही मुसेवाला करू'; काँग्रेस आमदाराला जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 08:15 IST

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंजाबमधील मानसा येथे जाऊन सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली

चंडीगड - प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांची अज्ञात हल्लेखोरांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर देशभरात यावरून प्रतिक्रिया उमटल्या. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत काही संशयितांना अटकही केली आहे. मुसेवाला हत्याकांडाचे पुणे कनेक्शनही समोर आले आहे. यातच आता, काँग्रेसआमदारालाही थेट जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सुधरा, अन्यथा तुमचाही मुसेवाला करू, अशी धमकी काँग्रेसआमदाराला देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंजाबमधील मानसा येथे जाऊन सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी, पंजाबमधील आप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. अलीकडेच झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत सिद्धू मूसवाला यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मानसा गावातून निवडणूक लढवली होती. देशात मुसेवाला यांच्या हत्येची चर्चा होत असतानाच आता हरयाणाच्या काँग्रेस आमदारालाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 

हरयाणाचे वरिष्ठ काँग्रेस नेते आणि आदमपूरचे आमदार कुलदीप बिश्नोई यांना अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सुधर जा, वरना मुसेवाला के साथ जो हुआ, वो तेरे साथ होगा... असा मसेज त्यांच्या मोबाईलवर आला आहे. याप्रकरणी आदमपूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बिश्नोई यांचे खासगी सचिव भूप सिंह मंडी यांनी फिर्याद दिली असून, व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे कुलदीप बिश्नोई यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं त्यांनी तक्रारी म्हटलं आहे. पोलिसांनी भादंवि 506 आणि आयटी अॅक्टच्या कलम 67 अन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, हरयाणामध्ये जाट आणि गैरजाट यांच्या राजकारणाचा मोठा इतिहास आहे. कुलदीप बिश्नोई यांना राज्यातील प्रमुख गैर जाट मानले जाते. 

राहुल गांधींचा आपवर निशाणा

राहुल गांधी यांनी ट्विट करत पंजाबमधील आप सरकारवर सडकून टीका केली आहे. काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्या आई-वडिलांना ज्या दु:खाचा सामना करावा लागत आहे, ते शब्दात सांगणे कठीण आहे. त्यांना न्याय देणे आमचे कर्तव्य आहे आणि आम्ही पार पाडू. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. आप सरकार पंजाबमध्ये शांतता राखण्यात अपयशी ठरले आहे, या शब्दांत राहुल गांधी यांनी आप सरकारवर हल्लाबोल केला आहे. पंजाबमधील मानसा गावात पोहोचलेल्या राहुल गांधींनी मुसेवाला यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली. सुमारे ४५ मिनिटे ते सिद्धू कुटुंबासोबत होते. यावेळी त्यांच्यासोबत पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वाडिंग, प्रताप सिंग बाजवा आणि माजी उपमुख्यमंत्री अंबिका सोनी उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेसCrime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणाMLAआमदारPoliceपोलिस