शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

प्रामाणिकपणे काम करणा-या सामाजिक संस्थांवर महापालिकेचा अन्याय

By admin | Updated: May 25, 2015 02:09 IST

परिवर्तन संस्थेतर्फे निषेध पुणे : महापालिकेतर्फे सामाजिक संस्थांना दिली जाणारी देणगी स्थानिक नगरसेवक संस्थांच्या कायर्कारिणीवर असेल तरच देण्याविषयी महापालिकेच्या सवर्साधारण सभेने केलेल्या ठरावाचा निषेध परिवर्तन संस्थेचे सचिव तन्मय कानिटकर यांनी केला आहे. नगरसेवक पदाधिकारी नसणा-या पण प्रामाणिकपणे काम करणा-या सामाजिक संस्थांवर हा अन्याय आहे. आणि म्हणूनच या प्रस्तावाचा परिवर्तन संस्थेतर्फे ...



परिवर्तन संस्थेतर्फे निषेध
पुणे : महापालिकेतर्फे सामाजिक संस्थांना दिली जाणारी देणगी स्थानिक नगरसेवक संस्थांच्या कायर्कारिणीवर असेल तरच देण्याविषयी महापालिकेच्या सवर्साधारण सभेने केलेल्या ठरावाचा निषेध परिवर्तन संस्थेचे सचिव तन्मय कानिटकर यांनी केला आहे. नगरसेवक पदाधिकारी नसणा-या पण प्रामाणिकपणे काम करणा-या सामाजिक संस्थांवर हा अन्याय आहे. आणि म्हणूनच या प्रस्तावाचा परिवर्तन संस्थेतर्फे आम्ही कडक शब्दात निषेध करतो, असे त्यांनी नमूद केले.
कानिटकर यांनी म्हटले आहे की दरवर्षी महापालिका काही सामाजिक संस्थांना देणगी देते. त्यासाठी महापालिकेच्या आर्थिक अंदाजपत्रकात तरतूदही केली जाते. सवर्साधारण सभेत पारित झालेल्या प्रस्तावानुसार आता ही देणगी केवळ त्याच संस्थाना देण्यात येणार आहे ज्या संस्थांच्या कायर्कारिणीवर स्थानिक नगरसेवक असतील.
महापालिकेचा पैसा म्हणजेच पुणेकरांचा पैसा असून हा देणगीरूपाने पुणेकरांसाठी काम करणा-या प्रामाणिक सामाजिक संस्थांना देण्यात यावा की नाही याविषयी स्वतंत्र चर्चा करता येईल. मात्र या देणग्या दिल्या जात असताना त्या नगरसेवक पदाधिकारी असणा-या संस्थांनाच देण्याचा हा प्रस्ताव म्हणजे पुणेकरांच्या पैशाने सामाजिक कामाचा आव आणून स्थानिक नगरसेवकांनी राजकीय लाभ मिळवण्याचा प्रकार आहे, असे कानिटकर यांनी म्हटले आहे.
ते म्हणतात, नगरसेवक पदाधिकारी नसणा-या पण प्रामाणिकपणे काम करणा-या सामाजिक संस्थांवर हा अन्याय आहे. आणि म्हणूनच या प्रस्तावाचा परिवर्तन संस्थेतर्फे आम्ही कडक शब्दात निषेध करतो. सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी प्रभाग समितीवर नेमण्याच्या ऐवजी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याचा प्रकार नुकताच पुणेकरांनी बघितलेला असताना, आता तर राजरोसपणे सामाजिक संस्थेच्या नावाखाली स्वत:चे महत्व वाढवण्याचा उद्योग पुणे महापालिकेतल्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमताने सुरु केला आहे, असे म्हणावे लागते आहे.
आजची बिघडलेली राजकीय संस्कृती या प्रस्तावामुळे अधिकच बिघडत जाणार असे आमचे स्पष्ट मत आहे. याविषयी परिवर्तनतर्फे महापौरांना प्रथम नागरिक या नात्याने पत्रही लिहिण्यात आले असून सवर्साधारण सभेला हा प्रस्ताव मागे घेण्याची विनंती करण्याविषयी सुचवले आहे,असे कानिटकर यांनी नमूद केले.