बंद शाळासंदर्भात मनपा धोरण राबविणार

By Admin | Updated: February 16, 2015 23:55 IST2015-02-16T23:55:08+5:302015-02-16T23:55:08+5:30

भाडे केव्हा भरणार : शाळांवर संस्था चालकांचा ताबा

The Corporation will implement the policy with closed schools | बंद शाळासंदर्भात मनपा धोरण राबविणार

बंद शाळासंदर्भात मनपा धोरण राबविणार

डे केव्हा भरणार : शाळांवर संस्था चालकांचा ताबा
नागपूर : महापालिकेच्या बंद पडलेल्या शाळा वापरासंदर्भात लवकरच नवीन धोरण अमलात आणले जाणार असल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत दिली.
संस्थाचालकांनी गत काळात केलेल्या करारांची चौकशी करून भाड्याचे नवीन दर आकारण्यात यावे. यासाठी दोन महिन्यात कायदा करून नवीन भाडेकरू नियुक्त करण्याचे निर्देश महापौर प्रवीण दटके यांनी दिले. मनपाच्या ३० शाळांच्या १३५ खोल्या गतकाळात भाड्याने दिल्या आहेत. परंतु संस्थाचालक भाडे देत नाही. त्यांच्याकडे लाखो रुपयांची थकबाकी असल्याचे आभा पांडे यांनी निदर्शनास आणले.
चौकट...
अतिरिक्त शिक्षक विभागात परतणार
मनपाच्या मालमत्ता विभागात पाठविण्यात आलेल्या १०० अतिरिक्त शिक्षकांपैकी गरज असलेल्या शिक्षकांना शिक्षण विभागात परत बोलावण्याचे निर्देश महापौरांनी दिले. ज्या शाळांना शिक्षकांची गरज आहे. तेथे त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रफुल्ल गुडधे, यशश्री नंदनवार यांनी शिक्षकांना अकारण अतिरिक्त ठरविल्याचे निदर्शनास आणले. दयाशंकर तिवारी यांनीही मुलांच्या भवितव्यासोबत तडजोड करू नये ,असे मत मांडले.(प्रतिनिधी)

Web Title: The Corporation will implement the policy with closed schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.