शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

CoronaVirus Lockdown News: देशाला माझी गरज, दारू आणायला जाऊ द्या; पोलिसांनी अडवताच लोक सांगताहेत भन्नाट कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 9:23 AM

CoronaVirus Lockdown News: देशातील अनेक शहरांमध्ये वीकेंड लॉकडाऊन; घरी थांबण्याचं आवाहन करूनही अनेकजण विनाकारण बाहेर

दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक झपाट्यानं वाढत आहे. राजधानी दिल्लीत कोरोना वेगानं हातपाय पसरत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केजरीवाल सरकारनं वीकेण्ड कर्फ्यू लागू केला आहे. मात्र तरीही लोक घरी थांबायला तयार नाहीत. अनेक जण तर गरज नसताना बाहेर पडत आहेत. पोलिसांनी त्यांना अडवलं असता एकापेक्षा एक कारणं देत आहेत. उनाड मंडळींकडून दिली जाणारी कारणं पोलिसांना डोक्यावर हात मारण्याची वेळ आली आहे. राज्यात कडक लॉकडाऊन करा, सरकारमधील ज्येष्ठ मंत्र्याची मागणी; अजितदादांशी चर्चा, मुख्यमंत्र्यांशीही बोलणारवीकेण्ड लॉकडाऊन सुरू असताना पोलिसांनी एका व्यक्तीला रोखलं. सध्या नवरात्र सुरू आहे. एका ठिकाणी मातेची उपासना सुरू आहे. तिथे जात असल्याचं कारण त्यानं दिलं. मातेची उपासना अत्यावश्यक सेवेत येते का, असा प्रश्न पोलिसांनी त्याला विचारलं. त्यावर अनेक दिवसांपासून मी तिथे जातो. आता सवय झाली आहे, असं त्या व्यक्तीनं सांगितलं.सगळ्यांनी मिळून माझ्या बाबांना मारून टाकलं; कोरोनानं वडील गमावलेल्या मुलाचा आक्रोश''देश संकटात आहे, मला जाऊ द्या''एका व्यक्तीला पोलिसांनी लॉकडाऊन दरम्यान हटकलं. पोलिसांनी जामिया परिसरात या व्यक्तीला रोखलं. या व्यक्तीनं सांगितलेलं कारण ऐकून पोलिसांनी अक्षरश: डोक्यावर हात मारला. मी दारू आणायला जात आहे. माझा देश संकटात आहे. त्यामुळे मी दारू आणायला निघालो आहे. यामुळे सरकारला महसूल मिळेल, असा युक्तीवाद या व्यक्तीनं केला. पोलिसांनी त्या व्यक्तीकडून दंड आकारला आणि त्याला घरी जाण्यास सांगितलं.वीकेण्ड लॉकडाऊन असल्यानं ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. नागरिकांनी नियमांचं उल्लंघन करू नये यासाठी पोलीस तैनात आहेत. नियम मोडणाऱ्यांना पकडून पोलीस त्यांच्याकडून दंड आकारत आहेत. मात्र तरीही अनेक जण नियम मोडत आहेत. भाजी आणायला जात आहे. पीठ संपलं आहे. ते आणायला जात आहे, अशी एकापेक्षा एक कारणं नागरिक देत आहेत. काही जण तर पोलिसांशी विनाकारण हुज्जत घालत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या