CoronaVirus News: सगळ्यांनी मिळून माझ्या बाबांना मारून टाकलं; कोरोनानं वडील गमावलेल्या मुलाचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 08:22 AM2021-04-18T08:22:29+5:302021-04-18T08:25:27+5:30

CoronaVirus News: शरीरतील ऑक्सिजनची पातळी घसरल्यानं मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडे मदत मागूनही प्रतिसाद नाही

CoronaVirus News Old Man Died Due To Lack Of Treatment in lucknow | CoronaVirus News: सगळ्यांनी मिळून माझ्या बाबांना मारून टाकलं; कोरोनानं वडील गमावलेल्या मुलाचा आक्रोश

CoronaVirus News: सगळ्यांनी मिळून माझ्या बाबांना मारून टाकलं; कोरोनानं वडील गमावलेल्या मुलाचा आक्रोश

googlenewsNext

लखनऊ: उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह डझनभरहून अधिक आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं संपूर्ण आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. लखनऊमध्ये नुकत्याच घडलेल्या एक हृदयद्रावक घटनेनं याचा प्रत्यय आला. 

रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा; ‘रेमडेसिविर’ झाले स्वस्त, जाणून घ्या नवी किंमत

लखनऊमध्ये वास्तव्यास असलेले मुक्त पत्रकार विनय श्रीवास्तव यांची प्रकृती काल बिघडली. त्यांनी ट्विटरवर मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करून मदत मागितली. कित्येक तास त्यांनी रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ३१ पर्यंत पोहोचली. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. ते ६५ वर्षांचे होते. विनय श्रीवास्तव यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

बारामतीतील प्रकार! रेमडेसिविरच्या बाटल्यांमध्ये पॅरासिटीमोल भरून विक्री

विकास नगरमध्ये राहणाऱ्या विनय श्रीवास्तव यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण वेगानं कमी घसरत होतं. ऑक्सिजनची पातळी ५२ वर असताना त्यांनी ट्विटरवर योगी आदित्यनाथ यांना टॅग केलं. 'तुमच्या राज्यात डॉक्टर आणि रुग्णालयं निरंकुश झाली आहेत. मी ६५ वर्षांचा आहे. मला स्पाँडिलायसिसचा त्रास आहे. माझ्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ५२ वर आली आहे. कोणतंही रुग्णालय, लॅब आणि डॉक्टर माझा फोन घेत नाहीत,' असं श्रीवास्तव यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

आपण वडिलांना घेऊन अनेक रुग्णालयांमध्ये गेलो होतो. मात्र कोणीही आम्हाला आत येऊच दिलं नाही, असा अतिशय गंभीर आरोप विनय यांचा मुलगा हर्षितनं केला. 'मी वडिलांना घेऊन बऱ्याच रुग्णालयांमध्ये गेलो. पण आधी कोविड चाचणीचा रिपोर्ट आणा. मग उपचार होतील, अशी उत्तरं मला मिळाली. कोविड चाचणीचा अहवाल यायला २४ तास लागतील. त्यामुळे माझ्या वडिलांना आताच दाखल करून घ्या, यासाठी डॉक्टरांकडे विनंती केली. पण कोणीही माझं ऐकलं नाही. सगळ्यांनी मिळून माझ्या वडिलांना मारून टाकलं,' अशा शब्दांत हर्षितनं आक्रोश केला.

Web Title: CoronaVirus News Old Man Died Due To Lack Of Treatment in lucknow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.