शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कोरोनाच्या लढ्यात भारताला World Bankचा आधार; कोट्यवधींचा निधी देण्याचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 13:13 IST

चार वर्षांत परियोजनेंतर्गत महारोगराईच्या काळात भारतीय आरोग्य प्रणाली आणखी विकसित आणि अद्ययावत करण्याचा जागतिक बँकेचा मानस आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, मोदींनी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तसेच कोरोनापासून बचावासाठी लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहनही करण्यात येत आहे. भारतीय आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षम करण्यासाठी आता जागतिक बँक सहाय्य करणार आहे.

नवी दिल्लीः कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, मोदींनी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तसेच कोरोनापासून बचावासाठी लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहनही करण्यात येत आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत असल्यानं मोदींनी पीएम केअर्स फंडाची स्थापना केली, त्या फंडाद्वारे अनेक मदतीचे हात पुढे आले आहेत. भारतीय आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षम करण्यासाठी आता जागतिक बँक सहाय्य करणार आहे. जागतिक बँकेनं भारत सरकारला चार वर्षीय आरोग्य योजनेंतर्गत १ बिलियन डॉलर म्हणजे ७ हजार कोटी देण्याचा प्रस्ताव दिला आहे. चार वर्षांत परियोजनेंतर्गत महारोगराईच्या काळात भारतीय आरोग्य प्रणाली आणखी विकसित आणि अद्ययावत करण्याचा जागतिक बँकेचा मानस आहे.परियोजनेनुसार, भारताची स्वास्थ्य प्रणाली योग्य पद्धतीनं चालवण्यासाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. जागतिक बँकेनं देऊ केलेल्या निधीमुळे देशाला कोरोनाच्या धोक्यापासून रोखण्यासही मदत मिळणार आहे. मोदी सरकारला ही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत जाण्याची भीती सतावते आहे. त्यामुळे यासाठी एका दीर्घकालीन रणनीतीवर काम करण्याची आवश्यकता आहे. त्याच पार्श्वभूमीवर जागतिक बँकेनं हा मदतीचा हात पुढे केला आहे.भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या १४४०वर पोहोचली असून, हा आकडा सातत्याने वाढत आहे. त्यामध्ये २४ तासांत तब्बल २२७ रुग्ण आढळले आहेत. देशात १०१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवाडीनुसार आतापर्यंत देशात कोरोनामुळे ३८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याWorld Bankवर्ल्ड बँक