Coronavirus News : दुर्दैवी! हॉस्पिटलमध्ये मिळाला नाही बेड; ऑटोत पतीला तोंडाने श्वास देत राहिली पत्नी, पण......

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 01:58 PM2021-04-24T13:58:53+5:302021-04-24T14:02:51+5:30

Coronavirus : पत्नीने अनेकदा स्वत:च्या तोंडाने पतीला ऑक्सीजन देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र, अनेक प्रयत्न करूनही ती पतीचा जीव वाचवू शकली नाही.

Coronavirus : Wife breaths gave to husband through her mouth for save life in Agra | Coronavirus News : दुर्दैवी! हॉस्पिटलमध्ये मिळाला नाही बेड; ऑटोत पतीला तोंडाने श्वास देत राहिली पत्नी, पण......

Coronavirus News : दुर्दैवी! हॉस्पिटलमध्ये मिळाला नाही बेड; ऑटोत पतीला तोंडाने श्वास देत राहिली पत्नी, पण......

Next

(Image Credit : amarujala.com)

कोरोना व्हायरसच्या(Coronavirus) दुसऱ्या लाटेने जनतेला चांगलाच धक्का दिला आहे. ऑक्सीजनच्या (Oxygen) कमतरतेमुळे लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये जसं चित्र आहे तसंच आग्र्यातही (Agra) आहे. शुक्रवारी दुपारी एक महिला आपल्या पतीला घेऊन ऑटोने एसएन मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचली होती. तिच्या पतीला श्वास घेण्यास त्रास होत होता. पत्नीने अनेकदा स्वत:च्या तोंडाने पतीला ऑक्सीजन देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र, अनेक प्रयत्न करूनही ती पतीचा जीव (Men died without oxygen) वाचवू शकली नाही.

विकास सेक्टर सातमध्ये राहणारे ४७ वर्षीय रवि सिंघल यांची तब्येत बिघडली होती. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे पत्नी रेणू सिंघल नातेवाईकांसोबत रवि यांना घेऊन श्रीराम हॉस्पिटल, साकेत हॉस्पिटल आणि केजी नर्सिंग होममध्ये गेली होती. बेड उपलब्ध नसल्याने त्यांना दाखल करून घेण्यात आलं नाही. (हे पण वाचा : CoronaVirus News: कोरोना रुग्णालयात निकृष्ट जेवण; भाजी अन् डाळीत सापडले किडे, रुग्ण संतापले)

अखेर रेणू या ऑटोने आजारी पतीला एसएस मेडिकल कॉलेजमध्ये आणलं. रस्त्यात त्या पुन्हा पुन्हा पतीला स्वत:च्या तोंडाने श्वास देण्याचा प्रयत्न करत होत्या. एसएन मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरांनी रवि यांना तपासून मृत घोषित केलं. रेणू यांना यावर आधी विश्वास बसला नाही. पण त्यानंतर त्यांचे अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते.

इतरही रूग्णांचे हाल

दरम्यान एसएन मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचलेल्या गोविंद प्रसाद गर्ग(७०) यांनाही दाखल करून घेण्यात आलं नाही. त्यांना ताप येत होता. श्वास घेण्यासही त्रास होत होता. तर वैभव नगरच्या राजकुमार यांना पोटाची समस्या होती. त्यांनाही दाखल करून घेण्यात आलं नाही. ते निराश होऊन परतले. त्यांना सांगण्यात आले की, गंभीर रूग्णांनाच इमरजन्सीमध्ये दाखल करत आहेत. (हे पण : CoronaVirus Live Updates : मोठा हलगर्जीपणा! धावत्या वाहनातून रस्त्यावर पडला कोरोनाग्रस्ताचा मृतदेह अन्...)

वाचा : 

तसेच रूनकता येथील संतोषला नातेवाईक दुपारी साडे तीन वाजता ऑटोने प्रभा हॉस्पिटलमध्ये पोहोचले. संतोषला उलटी, हगवण, श्वास घेण्यास त्रास होत होता. अर्धा त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा नातेवाईकांनी प्रयत्न केला. मात्र बेड रिकामा नसल्याने त्यांना भरती केलं गेलं नाही.

ऑक्सीजन संकटामुळे ३४ खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये गंभीर रूग्णांसाठी जीवन रक्षक उपकरणंही उपलब्द होत नाहीयेत. ३४ कोविड हॉस्पिटल्समध्ये हाय फ्लो ऑक्सीजन गॅस न मिळाल्याने ३५० पेक्षा अधिक नेजल कॅनुला, बायपेप, व्हेंटिलेटर बंद झाले आहेत. रूग्णांना थेट सिलेंडरने ऑक्सीजन दिलं जात आहे. 
 

Web Title: Coronavirus : Wife breaths gave to husband through her mouth for save life in Agra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.