Coronavirus : जमात पदाधिकाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल, पोलीस अधिकाऱ्याने सक्त ताकीद दिली तरीही...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 01:54 PM2020-04-01T13:54:09+5:302020-04-01T13:55:00+5:30

देशात कोरोनामुळे भीतीचे वातावरण असताना  तबलीग जमात आणि मरकज चर्चेच विषय ठरला आहे. याच दरम्यान या जमातीच्या एका मौलवींचा एक ऑडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे

Coronavirus: Video of police officials goes viral, despite strong warning to tabligi jamat of nijamudddin in lockdown | Coronavirus : जमात पदाधिकाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल, पोलीस अधिकाऱ्याने सक्त ताकीद दिली तरीही...

Coronavirus : जमात पदाधिकाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल, पोलीस अधिकाऱ्याने सक्त ताकीद दिली तरीही...

Next

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाने थैमान घातले असून भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. याच दरम्यान दिल्लीत झालेल्या एका धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या दोन हजारांपेक्षा अधिक लोकांमुळे कोरोनाचे लोण देशाच्या अनेक राज्यांत पसरले असल्याची शक्यता समोर आली आहे. यामध्ये सहभागी झालेल्यांपैकी काही जणांचे मृत्यू झाले आहेत. आणखी 200 जणांमध्ये प्राथमिक लक्षणे दिसू लागल्याने या आजाराचा धोका आणखी वाढला आहे. आता, या कार्यक्रमाच्या परवागनीबद्दल अनेक चर्चा घडत आहेत. त्यातच, तबलीगी जमात आणि निजामुद्दीन पोलीस ठाण्याचे अधिकारी मुकेश वालिया यांच्यातील संवाद व्हायरल होत आहे. 

देशात कोरोनामुळे भीतीचे वातावरण असताना  तबलीग जमात आणि मरकज चर्चेच विषय ठरला आहे. याच दरम्यान या जमातीच्या एका मौलवींचा एक ऑडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 'मरण्यासाठी मशिदीपेक्षा चांगली जागा नाही' असं वक्तव्य मरकजचे अध्यक्ष मौलाना साद यांनी व्हायरल ऑडिओमध्ये केले आहे. त्यानंतर, आता तबलीगी जमातचे पदाधिकारी आणि पोलीस अधिकारी वालिया यांच्यातील संवाद व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तबलीगी जमातच्या पदाधिकाऱ्यांना सक्तपणे ताकीद देऊन नोटीस देण्यात आली आहे. तसेच, ५ पेक्षा जास्त लोक या कार्यक्रमाला एकत्र येऊ शकत नाहीत, असेही वालिया यांनी या व्हिडीओत म्हटल्याचे दिसून येते. त्यावेळी, मरकबमध्ये आताही जवळपास १ हजार लोक असल्याचे मौलाना सांगत आहेत, हा व्हिडीओ २३ मार्च रोजीचा आहे. यावेळी, पोलीस अधिकारी वालिया यांनी मरकजच्या पदाधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचे सांगतिले होते, तरीही तबलीगी समाजाने ते ऐकलं नाही. दिल्ली पोलिसांनी २३ मार्च रोजी हा व्हिडीओ जारी केला होती, त्यानंतर आता सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दरम्यान, या घटनेनंतर निजामुद्दीन पोलिसांनी मरकजमधील जमातच्या आयोजकांवर २६९, २७०, २७१ आणि १२० बी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, मौलाना साद यांची ऑडिओ क्लीपही व्हायरल हतो आहे. 'मशिदीमध्ये जमा होण्यानं आजार होईल, हा विचारही मूर्खपणाचा आहे. तुम्हाला मशिदीत येण्यानं व्यक्ती मरेल असं दिसत असेल तरी मी तर म्हणतो की, मरण्यासाठी यापेक्षा चांगली जागा असून शकत नाही' असं मौलाना साद यांनी व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये म्हटल्याचं दिसत आहे. 'अल्लाहवर विश्वास ठेवा. कुराण वाचत नाहीत आणि वर्तमानपत्रं वाचतात आणि घाबरून पळत सुटतात. अल्लाह यासाठीच काहीतरी अडचणी निर्माण करतो, कारण त्याला पाहायचं असतं की अशा परिस्थितीत माझा बंदा काय करतो? जर कुणी म्हणत असेल की मशिदी बंद करायला हव्यात, टाळे लावायला हव्यात कारण हा आजार वाढत जाईल तर हा विचार तुमच्या मनातून काढून टाका' असंही मौलाना साद यांनी यामध्ये  म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Web Title: Coronavirus: Video of police officials goes viral, despite strong warning to tabligi jamat of nijamudddin in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.