शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

Coronavirus: 'त्या' पार्ट्यांमध्ये वसुंधरा राजेंनी कनिकासोबत काढलाय 'सेल्फी'; ही पाहा 'घट्ट' मैत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 7:08 PM

कनिका कपूरने रविवारी लखनऊमध्ये एक पार्टी आयोजित केली होती. त्यात अनेक बडे अधिकारी आणि काही नेतेमंडळीही उपस्थित होती.

लखनौ - 'बेबी डॉल' या गाण्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाल्याची बातमी येताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कारण, लंडनहून परतल्यानंतर काही दिवसांपूर्वीच तिने ३-४ पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती आणि तिथेच 300 ते  400 जणांना ती भेटली होती. हे सगळेच जण कनिकाच्या 'पॉझिटिव्ह' रिपोर्टमुळे गॅसवर आहेत आणि त्यात दोन खासदारांचाही समावेश आहे. त्यापैकी एक फोटो भाजपा नेत्या वसंधराराजे यांचा आहे. या फोटोमुळे वसंधराजेंच्या कार्यकर्त्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कनिका कपूरने रविवारी लखनऊमध्ये एक पार्टी आयोजित केली होती. त्यात अनेक बडे अधिकारी आणि काही नेतेमंडळीही उपस्थित होती. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे चिरंजीव भाजपा खासदार दुष्यंत सिंह हे देखील या पार्टीला गेले होते. त्यानंतर ते संसदेतही हजर राहिले होते. तिथे अनेकांना भेटले. अगदी, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्येही ते गेले होते. त्यामुळे कनिकाला कोरोनाची लागण झाल्याचं उघड होताच, संसदेत धाकधूक वाढली आहे. दुष्यंत सिंह क्वारंटाईनमध्ये असून आपण सर्वतोपरी खबरदारी घेत असल्याचं ट्विट वसुंधरा राजे यांनी केलंय. आता, वसुंधराराजे यांच्यासमवेतचा कनिका कपूरचा फोटो समोर आला आहे. त्यामुळे, कनिका आणखी किती बड्या नेत्यांच्या किंवा सेलिब्रिटींच्या संपर्कात आली होती, याची चर्चा रंगली आहे. तर, खासदार दुष्यंत कुमार आणि मातोश्री वसुंधरराजे यांना जंगी पार्टी चांगली भारी पडली, असेही म्हटलं जातंय. सध्या सोशल मीडियावर कनिका आणि वसुंधराराजे यांचा फोटो व्हायरल होत आहे. एकूण २ ते ३ पार्ट्या झाल्या असून या पार्ट्यांत वसुंधराराजे आणि कनिका अगदी जवळ आल्या होत्या.

  

तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी  संसदेचं अधिवेशन थांबवण्याची मागणी केली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ते दुष्यंत सिंह यांच्या शेजारीच बसले होते. त्यामुळे तेही चिंतेत आहेत.

दरम्यान, आपली कोरोना चाचणी 'पॉझिटिव्ह' आल्यानंतर कनिकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली होती. ''गेल्या चार दिवसांपासून मला ताप येत असल्याने मी कोरोनाची टेस्ट केली असून ती पॉझिटिव्ह आली आहे. मी आणि माझे कुटुंब सध्या सगळ्यांपासून पूर्णपणे वेगळे राहात असून डॉक्टरांनी दिलेला सल्ला ऐकत आहोत. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांची देखील तपासणी केली जाईल. दहा दिवसांपूर्वी परदेशातून परतल्यावर विमानतळावर माझे स्कॅनिंग करण्यात आले होते. पण त्यावेळी कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. मी घरी येऊन दहा दिवस झाले असून गेल्या चार दिवसांपासून माझ्या शरीरात कोरोनाची लक्षणं जाणवत आहेत.'', असं तिनं म्हटलंय. परंतु, विमानतळावर तपासणी टाळून तिनं पळ काढल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. 

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूनं, अर्थात कोव्हेड 19 या आजारानं भारतातही दहशत निर्माण केली आहे. देशात 218 जणांना कोरोनाची लागण झाली असून या आजाराने चार जणांचा मृत्यूही झाला आहे. हा आजार प्रामुख्यानं परदेशातून आलेल्या व्यक्तींमध्ये दिसून येतोय. अशा परिस्थितीत, लंडनहून आल्यानंतरही घराबाहेर पडणं, पार्ट्यांमध्ये सहभागी होणं हा कनिका कपूरचा बेजबाबदारपणाच असल्याचा संताप नेटिझन्स व्यक्त करत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajasthanराजस्थानMember of parliamentखासदार