शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

Coronavirus vaccine update : आता जगातील प्रत्येक लस मिळणार भारतात; मोदी सरकारनं घेतला मोठा निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 3:08 PM

सरकारने ज्या लशींना परवानगी दिली आहे, त्या लशींची सर्वप्रथम पुढील 7 दिवसांपर्यंत 100 रुग्णांवर टेस्ट केली जाईल. यानंतर देशाच्या लसीकरण कार्यक्रमात त्यांचा समावेश करण्यात येईल.

नवी दिल्ली - देशातील लशींचा तुटवडा दूर करण्यासाठी मोदी सरकारने (Narendra Modi) मंगळवारी मोठा निर्णय घेतला. ज्या लशींना जगातील कोणत्याही देशाच्या सरकारी संस्थेने अप्रूव्हल दिले आहे. त्या सर्व लशींना भारतानेही मंजुरी दिली आहे. सरकारने आपल्या आदेशात ज्या संस्थांचा उल्लेख केला आहे. त्या संस्था अमेरिका, युरोप, ब्रिटन, जपान आणि WHO शी संबंधित आहेत. (Coronavirus vaccine update Narendra Modi government fast track emergency approvals for foreign corona vaccines)

लशीला मंजुरी देणाऱ्यांत यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन, यूरोपियन मेडिसिन एजन्सी, यूकेएमएचआरए, पीएमडीए जपान आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांचा समावेश आहे. यापूर्वी सरकारने रशियाच्या स्पुतिनक-V लशीलाही मंजुरी दिली आहे.

भारतात रशियन व्हॅक्सीन Sputnik V ला मंजुरी; जाणून घ्या, Covishield, Covaxinच्या तुलनेत किती आहे प्रभावी?

100 रुग्णांवर होणार 7 दिवस टेस्ट, मग व्हॅक्सीनेशन ड्राइव्हमध्ये करणार सामील -सरकारने ज्या लशींना परवानगी दिली आहे, त्या लशींची सर्वप्रथम पुढील 7 दिवसांपर्यंत 100 रुग्णांवर टेस्ट केली जाईल. यानंतर देशाच्या लसीकरण कार्यक्रमात त्यांचा समावेश करण्यात येईल. या निर्णयामुळे भारतात लशींची आयात करायला आणि लसीकरण कार्यक्रमात गती आणण्यास मदत मिळेल, असा दावा सरकारने केला आहे. तसेच, या निर्णयामुळे, औषध निर्माता कंपन्यांना विदेशी लस भारत तयार करण्याची मंजुरी मिळविणेही सोपे होईल.

एकदिवस आधीच देशाला मिळाली तिसरी कोरोना लस -सोमवारी तज्ज्ञांच्या समितीने स्पुतनिक-V या रशियन लशीच्या इमर्जंनी वापराला परवानगी दिली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI)नेही या लशीला परवानगी दिली आहे. त्यामुळे ही, भारताच्या कोरोना लसीकरण अभियानात सामील होणारी तिसरी लस ठरली आहे. यातच, रशियन डायरेक्ट इंव्हेस्टमेन्ट फंड (RDIF)ने म्हटले आहे, की स्पुतनिक-V च्या इमरजन्सी वापराला मंजुरी देणारा भारत जगातील 60 वा देश ठरला आहे.

corona vaccine : म्हणून फायझर, मॉडर्नाऐवजी स्पुटनिक-V लसीला भारताने दिला परवानगी, ही आहेत कारणे

भारतात 16 जानेवारीला लसीकरणाला सुरुवात -भारतात 16 जानेवारीला लसीकरण अभियानाला सुरुवात झाली होती. यासाठी याच वर्षाच्या सुरुवातीला कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनला मंजुरी देण्यात आली होती. कोविशिल्ड ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनेकाने संयुक्तपणे तयार केली आहे. पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये (SII) हिचे उत्पादन सुरू आहे. तर कोव्हॅक्सिन भारत बायोटेकने इंडियन काउंसिल फॉर मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या (NIV) साथीने तयार केली आहे.Covishield आणि Covaxin, या दोन्ही लशी सरकारी रुग्णालयांत मोफत दिल्या जात आहेत. खासगी रुग्णालयांतून ही लस घेतल्यास 250 रुपये प्रति डोस, असे शुल्‍क घेतले जाते. सरकार सीरम इंस्टिट्यूट आणि भारत बायोटेकला प्रति डोस 150 रुपये देत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र, व्हॅक्सीन सप्लायसह केल्या 'या' तीन मागण्या

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी