शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

Coronavirus Vaccine : Covishield पाठोपाठ Covaxin लसीचे दरही कमी; भारत बायोटेकने केली महत्त्वाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 6:00 PM

सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत लसीकरण महत्त्वाचं मानलं जात आहे. 

ठळक मुद्देसध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे.अशा परिस्थितीत लसीकरण महत्त्वाचं मानलं जात आहे. 

सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत लसीकरण महत्त्वाचं मानलं जात आहे. १ मे पासून केंद्र सरकारनं १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण हा पर्याय असल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी लस उत्पादक कंपन्यांच्या झालेल्या बैठकीनंतर सरकारनं एकूण लस उत्पादनाच्या ५० टक्के लसी खुल्या बाजारपेठेत विकण्याची मुभा दिली होती. त्यानंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी आपल्या लसीचे दर जाहीर केले होते. परंतु एकाच लसीचे तीन दर का असं म्हणत अनेकांनी त्यावर टीका केली होती. तसंच लसीचे दर कमी करण्याची मागणी अनेक स्तरातून होत होती. अशा परिस्थितीत बुधवारी सीरमनं आपल्या कोविशिल्ड या लीसचे राज्यांसाठी दर कमी केले होते. त्यानंतर गुरूवारी भारत बायोटेकनं आपल्या कोवॅक्सिन या लसीचे राज्यांसाठी दर कमी केले आहेत. भारत बायोटेकही आपली लस राज्यांना आता ४०० रूपये प्रति डोस या दरात उपलब्ध करून देणार आहे.बुधवारी सीरम इन्स्टिट्यूटनं राज्यांना देण्यात येणाऱ्या कोविशिल्ड या लसीचे दर कमी केले होते. त्यानंतर गुरूवारी भारत बायोटेकनं आपल्या लसीचे दर कमी केले आहेत. भारत बायोटेक आता राज्यांना ४०० रूपये प्रति डोस या दरात लस उपलब्ध करून देणार आहे. भारत बायोटेकनं एक पत्रक जारी करत याबाबत माहिती दिली. सीरमनं केले होते दर कमीसीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने राज्यांना देण्यात येणाऱ्या कोविशिल्ड लशीची प्रतिकुपी किंमत १०० रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे ही लस आता ३०० रुपयांना उपलब्ध होणार आहे. व्यापक जनहिताच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे ट्विट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी केलं होतं. नुकत्याच झालेल्या दरपत्रकानुसार ‘सीरम’ची कोविशिल्ड लस राज्यांना ४०० रुपयांना दिली जाणार होती. त्यावरून राज्यांकडून मोठा आक्षेप घेण्यात आला होता. खासगी रुग्णालयांत हीच लस ६०० रुपयांना उपलब्ध होणार होती. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ॲस्ट्राझेनेका यांनी विकसित केलेली ही कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लस ‘सीरम’तर्फे भारतात उत्पादित करण्यात येत आहे. १ मे पासून सुरू करण्यात येणाऱ्या व्यापक लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह काही राज्यांनी सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकला लसींची ऑर्डर दिली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी